लखन
काळची गरज
विरित संवकर
वित्रीचलतचित्र
माहितीचे आदानप्रदान
दुष्परिणाम
लहान मुलांना वितिया
खेळाची आसक्ती.
-
ममणाटवनी-फायदे
आणि तोटी
विवेकान वापराची गाज
गरजा
Answers
Answer:
आपल्या मुलाचा वाढदिवस हा वर्षातला असा एक दिवस आहे की ज्या दिवशी सगळं अगदी छान आणि नीट पार पडलं पाहिजे हो ना? जसे की जेवणाची व्यवस्था, भेटवस्तू, पार्टी मध्ये खेळले जाणारे खेळ इत्यादी. खेळांचा वाईट क्रम आपल्या सर्व आयोजनावर पाणी फिरवू शकतो. खेळांचे नियोजन जर उत्तम असेल तर अचानक ठरलेली पार्टी सुद्धा यशस्वीरित्या पार पडू शकते. लहान मुलांचे खेळाच्या माध्यमातून कसे मनोरंजन करावे याबाबत तुम्ही विचारात पडला असाल तर, नेहमी छोट्या छोट्या खेळांनी सुरुवात करा. असे केल्याने मुलांना जास्त मज्जा येईल. येथे मुलांसाठी वाढदिवसाच्या वेळी खेळण्याजोगे काही मनोरंजक खेळ दिले आहेत, जे लहान मुलांना व्यस्त ठेवू शकतात.
वाढदिवस पार्टी खेळ निवडताना विचारात घ्याव्यात अशा सूचना
लहान मुलांच्या पार्टीसाठी खेळ निवडणे सोपे वाटते. परंतु आपण खेळ निवडण्यापूर्वी, पार्टीला आलेली सगळी मुले खेळात सहभागी होत आहेत ना, ह्याची खात्री करण्यासाठी खालील काही सूचनांचा आपण विचार करू शकता. १. पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मुलांचे सरासरी वय लक्षात घ्या आणि काही विशिष्ट वयोगटातील नव्हे तर सर्वांना खेळता येतील असे खेळ निवडा. २. जर एखाद्या खेळात खूप मज्जा येत असेल आणि तो आपण निवडलेल्या विषयाशी सुसंगत नसेल तरीही तो निवडायला घाबरू नका. ३. बौद्धिक खेळ मर्यादित ठेवा आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी भरपूर खेळ ठेवा. मुलांसाठी शाळा आणि घरी दोन्हीकडे पुरेसे बौद्धिक खेळ नेहमीच असतात. ४. मुली आणि मुलांसाठी वेगवेगळे खेळ ठेऊ नका. असे खेळ निवडायचा प्रयत्न करा ज्यामध्ये लिंगभेद नसेल. तसेच प्रत्येक जण खेळात भाग घेऊ शकेल याची खात्री झाल्याशिवाय खेळाची निवड करू नका. ५. चांगली योजना करा आणि तयारी करा. खूप मुलांकडून हे खेळ खेळवून घेणे हे एक आव्हान असू शकते. प्रत्येक खेळादरम्यान कोणताही गोंधळ टाळण्यासाठी आगाऊ योजना करण्याचा प्रयत्न करा.
मुलांच्या वाढदिवसासाठी १५ मजेदार खेळ
१. अंक आणि बक्षीस
हा खेळ दोन ते चार वर्षांच्या मुलांसाठी आदर्श आहे. खेळ कसा खेळायचा? चौकोनी तक्त्यावर १ ते ३० मधील संख्या लिहा आणि जमिनीवर एका वर्तुळात चिकटवा. समान संख्या लिहिलेल्या लहान चिठ्ठया बनवा आणि एका टोपलीत ठेऊन एकत्र करा. संगीत सुरु करून मुलांना वर्तुळाभोवती फिरण्यास सांगा आणि त्यांना संगीत बंद झाल्यावर, कोणत्याही नंबरवर जाऊन थांबायला सांगा. आता टोकरीतून एक चिट्टी उचला. ज्या संख्येवर खेळाडू थांबला आहे तीच संख्या चिट्टीत निघाली तर त्या खेळाडूला बक्षीस मिळेल. सर्व मुलांना बक्षिसे मिळेपर्यन्त हा खेळ तुम्ही सुरु ठेऊ शकता.
२. बुडबुडे फोडणे
हा साधा खेळ खूप मजेदार आहे आणि ३ वर्षांच्या मुलांसाठी योग्य आहे आणि हा खेळ खेळण्यासाठी केवळ काही जागा आणि भरपूर बबल रॅप आवश्यक आहे. खेळ कसा खेळायचा? खुल्या जागेत जमिनीवर बबल रॅप ची चादर पसरून ठेवा. आता मुलांना बुडबुडा न फोडता चादर ओलांडण्यास सांगा. जो खेळाडू आवाज न करता ती चादर ओलांडेल तो विजयी ठरेल.
३. फोटो स्कॅव्हेंजर हंट
हा खेळ सर्व वयोगटातील मुले खेळू शकतात आणि तो कुठेही खेळला जाऊ शकतो. मुलाच्या वयानुसार खेळाच्या काठिण्य पातळीत बदल करणे आवश्यक आहे. लहान मुलांमध्ये खेळाची सोपी आवृत्ती असू शकते तर मोठ्या मुलांमध्ये खेळाची किंचित जास्त आव्हानात्मक आवृत्ती असू शकते. खेळ कसा खेळायचा? यासाठी नकाशाचे चित्र तयार करा. मुलांना कुठे जाण्याची आवश्यकता आहे हे दर्शविण्यासाठी आणि त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी शोधण्यासाठी चित्र सूचना द्या. ह्या प्रत्येक चिन्हावर छोटं बक्षीस आणि चॉकलेट ठेवा. आपण सार्वजनिक ठिकाणी या खेळाचे आयोजन करीत असल्यास, मोठी मंडळी मुलासोबत असायला हवीत.
४. फुगे हवेत उडवून फोडणे
हा खेळ ४ वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी छान आहे आणि या खेळादरम्यान आपली हसून हसून पुरेवाट होते. खेळ कसा खेळायचा? कागदाच्या तुकड्यावर काही आव्हाने लिहा आणि फुगे फुगवण्याआधी लिहिलेली आव्हाने वेगवेगळ्या फुग्यांमध्ये घाला. जोपर्यंत संगीत चालू आहे तोपर्यंत मुलांना हवेत फुगे उडवणे आवश्यक आहे. संगीत जेव्हा थांबते, तेव्हा फुग्याला स्पर्श करणारा शेवटचा कोण होता, त्याने आपला फुगा फोडून आणि त्यामधील आव्हान पार करावे. उदा : नाच करणे आव्हाने निवडताना सर्जनशील व्हा.