ललित साहित्याची संकल्पना व स्वरूप सविस्तर विशद करा
Answers
मराठी वाङ्मयाचे( साहित्य ) दोन प्रकार पडतात प्रथम ललित वाङ्मय प्रकार आणि दूसरा ललितेतर वाङ्मय प्रकार
ललितेतर वाङ्मय किंवा साहित्यात शब्दांचा प्रभाव महत्वाचा ठरतो. त्यात ज्ञान आणि महितीचा साठा मोठ्या प्रमाणावर असतो ज्यात रसायनशास्त्रातील माहिती असेल किंवा वनस्पतिविज्ञान , प्राणिविज्ञान अश्या महितीपूरक साहित्याचा समावेश असतो मात्र ललित वाङ्मय प्रकारात शब्दांचा प्रभाव तर असतोच पण त्याला जोड असते ती लेखकाच्या कल्पनाशक्तीची.
ललित साहित्य प्रकारात लेखकाला त्याचा कल्पनाशक्तीचा वापर करून साहित्यास अतिशय प्रभावशाली बनवावे लागते.ललित साहित्याला लेखकाच्या कल्पनाशक्तीचा आधार असला तरी वास्तवातील व्यक्ती, घटना, प्रसंग, तपशील यांचा समावेश त्याला साहित्यात करावा लागतो . लेखकाच्या कल्पक निर्मितीतून एक अनुभवविश्व हे ललित साहित्य मार्फत साकारले जाते .ललित साहित्यात काव्य, कथा, कादंबरी, नाटक ,लघुनिबंध, नाट्यछटा यांचा समावेश होतो.