मी आरसा बोलतोय आत्मकथन
Answers
Explanation:
मी आरसा बोलतोय आत्मकथन
Answer: मी परवा आरशासमोर उभी राहून माझा चेहरा पाहात होते. माझा रंग सावळा असल्याने सगळे मला चिडवतात. त्यामुळे मी नाराज होऊन आरशासमोर उभी होते देवाने मला सावळा रंग का दिला याचा विचार करत होते. तर ' अगं, रंगाचं काय घेऊन बसली आहे. तू मुळातच सुंदर दिसते आणि तुझं मन तर अजून सुंदर आहे' असा आवाज आला. मी घाबरून इकडे तिकडे पाहू लागले तर.आवाज आला की,'अगं, इकडे बघ. मी आरसा बोलतोय.'
मी नीट ऐकू लागले. आरसा बोलू लागला,'अगं माणसाने जसं आहे तसं राहावं. आता माझ्यासमोर उभे राहून मेकअप लावून कितीतरी जण सुंदर दिसतात. पण मनाची सुंदरता त्यांच्याकडे नसते. मी फक्त तुमचे बाह्य रूप दाखवून देतो. पण तुम्ही मनाने कसे आहात हे तुमच्या वागण्यातून दिसून येते. मुळात कोणी कुरूप नसतेच. विधात्याने जे काही दिले आहे त्यात आभार मानून आयुष्य सुंदर बनवायचं असतं.' आरश्याचं बोलणं मला पटलं. तेवढ्यात दारावर आईने थाप मारली आणि आरसा बोलायचा थांबला.
Explanation: