मी आरसा बोलतोय मराठी निबंध २पान
Answers
Explanation:
मी माझी दाडी निरखत होतो. ती अस्फुट अस्फुट दिसत होती .कसा आकर होईल तिचा ? मला मिशी हवी थोडीशी रुंदी.ओठांवरुन किंचीत उतरत उतरत येणारी आणि ओठांच्या टोकांवर येताच झटकन खाली वळणारी . माझ्या मिशीचा आकार हवा तसा मिळाला तर मी कसा दिसेन ? मी कोणाकोणाला आवडेन ? माझ्या डोळ्यां समोर काही चेहरे तरळू लागले . मी गुंग होत गेलो .
खळखळून हसण्याच्या आवाजाने माझ्या समाधीचा भंग झाला . मी चटकन इकडे तिकडे पाहिले. पण, समोरचा आरसाच मला हसत होता . हे कळायला मला फार वेळ लागला नाही . वा ! वा ! तू किती छान गुंग झाला होतास ,नाही का ? पण ,दे जाऊ दे . तुम्हा माणसांना स्वप्न दाखवण्यासाठीच तर माझा जन्म झाला आहे !
हे बघ , प्रत्येक माणसाचं स्वत: वर सर्वात जास्त प्रेम असत . आपण इतरांपेक्षा वेगळ दिसाव म्हणून ,प्रत्येक जण काहीतरी वेगळी कृती , कोणीही न केलेली नवीनच कृती करण्याचा प्रयत्नात असतो. या धडपडीतूनच माणसाने या पृथ्वतलावर अनंत पराक्रम गाजवले आहे. म्हणून तर आज माणूस सर्व प्राण्यांचा राजा , या पृथ्वीचा राजा म्हणून वावरतोय .