मि आरसा झालो तर मराठी निबंध
Answers
Explanation:
मी माझी दाडी निरखत होतो. ती अस्फुट अस्फुट दिसत होती .कसा आकर होईल तिचा ? मला मिशी हवी थोडीशी रुंदी.ओठांवरुन किंचीत उतरत उतरत येणारी आणि ओठांच्या टोकांवर येताच झटकन खाली वळणारी . माझ्या मिशीचा आकार हवा तसा मिळाला तर मी कसा दिसेन ? मी कोणाकोणाला आवडेन ? माझ्या डोळ्यां समोर काही चेहरे तरळू लागले . मी गुंग होत गेलो .
खळखळून हसण्याच्या आवाजाने माझ्या समाधीचा भंग झाला . मी चटकन इकडे तिकडे पाहिले. पण, समोरचा आरसाच मला हसत होता . हे कळायला मला फार वेळ लागला नाही . वा ! वा ! तू किती छान गुंग झाला होतास ,नाही का ? पण ,दे जाऊ दे . तुम्हा माणसांना स्वप्न दाखवण्यासाठीच तर माझा जन्म झाला आहे !
हे बघ , प्रत्येक माणसाचं स्वत: वर सर्वात जास्त प्रेम असत . आपण इतरांपेक्षा वेगळ दिसाव म्हणून ,प्रत्येक जण काहीतरी वेगळी कृती , कोणीही न केलेली नवीनच कृती करण्याचा प्रयत्नात असतो. या धडपडीतूनच माणसाने या पृथ्वतलावर अनंत पराक्रम गाजवले आहे. म्हणून तर आज माणूस सर्व प्राण्यांचा राजा , या पृथ्वीचा राजा म्हणून वावरतोय .
हे निबंध सुधा जरूर वाचवे:-
आरसा नसता तर...
पराक्रमी माणसांनी आपल्या पप्रत्येक पराक्रामानंतर आरशात स्वत:ला पाहिले असणारच आणि पाहता पाहता मुठी आवळून , हात उंचावून 'माझा विजय असो ' अस मोठ्याने मनातल्या मनात घोषणा देत स्वत: चा जयजयकार केला असणारच , हे लक्षात ठेव . तुमच्या मनातल्या या प्रेरणा निर्माण मीच आहे .मीच तुमची प्रगति घडवून आणतो .
आठवते का रे ? जत्रेत आपली भेट झाली होती ! किती विविध रुपात मी या आरसे महलात अवतरलो होतो ! तू तर नुसता लोटपोट हसत होतास . तुझ्या किती प्रतिमा पाहायला मिळाल्या होत्या ! गोलगरगरीत , हळकुंडी एकदम बुटकी , किती प्रतिमा ! एका आरशातील प्रतिमा आठवतं ? ,माझं डोक भोपळ्या एवढ ,बाकीचा वेष दोन - अडीच फुट फक्त ! काय हसत होता तुम्ही सगळेजण !
लक्षात ठेव . ही माझी रुप केवळ विनोद करण्यासाठी निर्माण झालेला नाहीत . ड्राइवरला पाठीमागून येणारी वाहने दाखवण्यासाठी मीच गाडीच्या कडेला बसतो . वेगवेगळी भिंग माझीच रुपं आहेत. प्रयोग शाळेच्या सुक्ष्मदर्शका पासून अवकाशातल्या ग्रह गोलांचे निरीक्षण करणार्या दुर्बिणी पर्यंत सर्वत्र मीच असतो . घरादारात , रस्त्यांवर, कपड्यांवर ,दुकानावर , गाड्यांमध्ये ,जत्रेमध्ये , इथे तिथे सर्वत्र मीच असतो . पण लक्षात ठेव , मी कधी स्वत : च्या मिजाशीत राहीलो नाही .
" पाणी पिण्यासाठी माणूस प्रथम नदीत वाकला तेव्हा त्याला स्वत:लाच स्वत : च दर्शन घडले असणार . तेव्हा पासून मी त्याच्या सोबत आहे . मी स्वत:ला बाजूला ठेवून माणसाला मदत केली . तू सुध्दा अशीच मदत करीत रहा . पहा , केवढा होशील तू ! "
Answer:
मी आरसा बोलतोय
मी माझी दाडी निरखत होतो. ती अस्फुट अस्फुट दिसत होती .कसा आकर होईल तिचा ? मला मिशी हवी थोडीशी रुंदी.ओठांवरुन किंचीत उतरत उतरत येणारी आणि ओठांच्या टोकांवर येताच झटकन खाली वळणारी . माझ्या मिशीचा आकार हवा तसा मिळाला तर मी कसा दिसेन ? मी कोणाकोणाला आवडेन ? माझ्या डोळ्यां समोर काही चेहरे तरळू लागले . मी गुंग होत गेलो .
खळखळून हसण्याच्या आवाजाने माझ्या समाधीचा भंग झाला . मी चटकन इकडे तिकडे पाहिले. पण, समोरचा आरसाच मला हसत होता . हे कळायला मला फार वेळ लागला नाही . वा ! वा ! तू किती छान गुंग झाला होतास ,नाही का ? पण ,दे जाऊ दे . तुम्हा माणसांना स्वप्न दाखवण्यासाठीच तर माझा जन्म झाला आहे !
हे बघ , प्रत्येक माणसाचं स्वत: वर सर्वात जास्त प्रेम असत . आपण इतरांपेक्षा वेगळ दिसाव म्हणून ,प्रत्येक जण काहीतरी वेगळी कृती , कोणीही न केलेली नवीनच कृती करण्याचा प्रयत्नात असतो. या धडपडीतूनच माणसाने या पृथ्वतलावर अनंत पराक्रम गाजवले आहे. म्हणून तर आज माणूस सर्व प्राण्यांचा राजा , या पृथ्वीचा राजा म्हणून वावरतोय .
I HOPE YOU LIKE