History, asked by Anonymous, 10 months ago

मी बाभूळ आहे essye ​

Answers

Answered by ItsShree44
1

⠀⠀⠀⠀⠀ मी बाभूळ आहे

मी बाभूळ आहे. मी एक काटेरी झाड आहे. माझे जास्तीत जास्त वास्तव्य हे जंगलात असते. क्वचित कोणी आमची मुद्दाम लागवड करतात. मला आंब्यासारखी रसाळ फळे येत नाहीत. चाफ्यासारखी सुगंधित फुले येत नाहीत. त्यामुळे मला फारशी किंमत नाही.

काही शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर माझी लागवड करतात. मला काटे असतात. त्यामुळे जनावरे माझ्या वाट्याला जात नाहीत. माझे लाकूड अतिशय भक्कम असते. माझा कणा ताठ असल्यामुळेच मी वादळवायलाही तोंड देते. कितीही वादळ सुटले, तरी मी ताठ उभी राहते. जोरात पाऊस आला, तर मी वाकते; पण मोडत नाही.

मला पिवळी फुले येतात. माझ्या शेंगा मुलांना खूप आवडतात. मुले त्या शेंगांशी व त्यांतील बियांशी खेळतात. सुतार पक्षी माझ्या फांदीवर आपले घरटे बांधतात. प्रतिकूल परिस्थितीतही जगावे आणि दुसऱ्यांच्या उपयोगी पडावे, हाच संदेश मी सर्वांना देते.

Similar questions