मोबाईल चा वापर योगय की अयोगय मराठी निबंध
Answers
◆◆मोबाईलचा वापर योगय की अयोगय◆◆
मोबाईलचा वापर योगय की अयोगय,हे आपल्यावर अवलंबून असते.
मोबाईल मानवजातीसाठी विज्ञानाची अनमोल भेट आहे.मोबाईलचे अनेक फायदे आहेत.जगातील बहुतांश लोकांशी आपण मोबाइलमुळे संपर्क साधू शकतो.
मोबाइलमुळे आपल्याला घरबसल्या कार्यालयाचे काम करता येते.मोबाइलमुळे आपण घरबसल्या वस्तूंची खरेदी करू शकतो तसेच त्यावरून लाइट,गॅस,इत्यादिचे बिल भरता येते.
परंतु, मोबाइलचे काही तोटे देखील आहेत.मोबाईलमुळे आपण आपल्या कामावर,अभ्यासावर नीट लक्ष देत नाही.सारखं मोबाइकडे पहिल्यामुळे आपल्या डोळ्यांनाही त्रास होऊ शकतो.
काही लोकं सामाजिक हिंसा व खोटी बातमी पसरवण्यासाठी फेसबुक,व्हाट्सअॅपचा वापर करतात.अश्लील चित्रे,एमएमएस बनवून लोकांना ब्लैकमेल केले जाते.
मोबाईलचे फायदे तसेच तोटेसुद्धा आहेत.आपण मोबाईलचा कशा प्रकारे वापर करतो,याच्यावरून ठरते की मोबाईलचा वापर योगय आहे की अयोगय.