Art, asked by sweety9414, 1 year ago

मोबाईल शाप की वरदान मराठी ​

Answers

Answered by Anonymous
34

मोबाईल

मोबाईल आजकाल विशेष लोकप्रिय आहे. प्रत्येकाच्या खिशात किंवा कानाजवळ मोबाईलला स्थान! लहान मुलांनाही मोबाईलचे आकर्षण वाटते. त्यामुळे खेळण्यातही मोबाईल आला आहे.

दूरध्वनीचेच काम मोबाईल करतो. पण मोबाईल हे फार पुढचे पाऊल आहे. दूरध्वनीवर जी बंधने होती, ती मोबाईलने तोडून टाकली आहेत. त्याला 'वायर' लागत नाही, कोणत्याही जोडणीची त्याला आवश्यकता नसते. त्यामुळे जगातील कोणत्याही ठिकाणी व कोणत्याही वेळी मोबाईलचा उपयोग करता येतो.

मोबाईल वापरण्यास सोपा असतो. त्यामुळे अशिक्षित लोकही तो वापरतात. फिरती कामे करणाऱ्यांना हा फार उपयोगी पडतो. एका जागी बसून कामे मिळवता येतात. येण्या-जाण्यातील वेळेचा अपव्यय टळतो. काही मोबाईलमध्ये गाणी ऐकणे, फोटो काढणे अशा सोयीसुविधाही असतात. काही लोक त्याचा दुरुपयोगही करतात. मात्र अडचणीत संकटांच्या वेळी मोबाईलचा चांगला उपयोग होतो. म्हणून तो आपला मित्र आहे.

Similar questions