मोबाईलचे फायदे व तोटे लिहा
Answers
Explanation:
गरजेची वस्तु बनलेली आहे । पूर्वी जसे म्हंटले जायचे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत,परंतु आता त्यात मोबाइल देखील माणसाची मूलभूत गरज बनला आहे ।
अगदी कमी कालावधीत ह्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाने माणसाच्या आयुष्यातील महत्वाचे स्थान काबीज केले आहे । आज आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईल हा महत्वाचा घटक बनला आहे । मोबाईल नसेल तर आपली अनेक कामे होत नाहीत आणि हल्ली तर मोबाईल शिवाय कामच होत नाही ।
आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. आजच्या या आधुनिक युगात तुमच्या हातात असलेला मोबाईल फोन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज मोबाइल आपल्या जीवनाचा एक भाग बनलेला आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे व प्रत्येकजण त्यातच व्यस्त आहे.
ही गोष्ट सत्य आहे की मोबाईल मुळे अनेक गोष्टी कमी वेळात व कमी कष्टात करता येतात. परंतु या मोबाईल चे जेवढे फायदे आहेत तेवढेच याचे दुष्परिणाम पण आहेत. आज आपण मोबाईल फोनचे फायदे (Fayde) व तोटे (Tote/Dushparinam) पाहणार आहोत.
मोबाईलचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो.
आज कालच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमुळे घर बसल्या अनेक गोष्टी करणे शक्य झाले आहे.
तुम्ही मोबाईल मध्ये मनोरंजनासाठी गाणी ऐकू शकतात, गेम खेळू शकतात व चित्रपट पाहू शकतात.
आज कालचे मोबाईल स्लिम असल्याने तुम्ही त्यांना खिश्यात ठेवून कुठेही जाऊ शकतात.
मोबाईल फोनच्या कॅमेराने तुम्ही फोटो, व्हिडिओ बनवू शकतात.
मोबाईल फोन मध्ये कॅलेंडर, कॅल्क्युलेटर, अलार्म, घड्याळ, नोटबुक इ. सुविधा असतात, म्हणून आता तुम्हाला या सर्व गोष्टी सोबत नेण्याची गरज नाही. आपल्या मोबाईल फोन च्या साह्याने आपण कॅलेंडर, कॅल्कुलेटर, अलार्म, घड्याळ, नोटबुक या गोष्टी वापरू शकतात.
कुठेही जायचे असल्यास मोबाईल मध्ये गूगल मॅप आणि GPS च्या मदतीने आपण रस्ता शोधू शकतो.
मोबाईल फोन मुळे बँकेत न जाता, घरबसल्या एका खात्यातून दुसर्या खात्यात पैसे पाठविणे शक्य झाले आहे.
मोबाईलच्या साह्याने तुम्ही ऑनलाईन अन्न देखील मागवू शकतात.