India Languages, asked by shrisha07, 1 month ago

मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे वाईट परिणाम लिहा मराठी मधी​

Answers

Answered by revatipatildi
3

Explanation:

1. डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मोबाईलचा अति वापर लोकांसाठी घातक ठरू शकतो. यामुळे होणारे रेडिएशन ब्रेन ट्युमर आणि ब्रेन कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतात.

2. काही लोकांना मोबाईलची इतकी सवय असते की, ते दररोज रात्री झोपताना मोबाईल जवळपास किंवा अगदी उशीखाली ठेवून झोपतात. जर, आपल्यालाही अशी सवय असेल तर, ती वेळीच मोडणे गरजेचे आहे. मोबाईलमधून उत्सर्जित होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे मेंदूच्या पेशी संकुचित होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत ऑक्सिजन मेंदूपर्यंत योग्यप्रकारे पोहोचत नाही.

3. यामुळे नैराश्य, अल्झायमर, तणाव यासारख्या अनेक मानसिक समस्या उद्भवू शकतात

4. मोबाईलमधून निघणाऱ्या किरणोत्सराचा तो परिणाम असतो. डोकेदुखी, चक्कर येणे, कामात मन न लागणे, मळमळ वाटणे, हे मोबाईलमधून निघणाऱ्या किरणोत्सराचा परिणाम होय, असे मत कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. नंदू कोलवाडकर यांनी व्यक्त केले.

Similar questions