Science, asked by marotivyankatrao, 16 days ago

मोबाइल आत्मकथन मराठी​

Answers

Answered by XxitsmrseenuxX
14

Answer:

                                          मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध

“हॅलो, हॅलो ! मी मोबाईल बोलतोय ! मी तुमचा लाडका मोबाईल ! आज मी बेहद्द खूश आहे बरं का ? तुमची माझी किती दोस्ती आहे, हे तुम्हांला मी सांगण्याची गरजच नाही. या दोस्तीमुळे मी आनंदी झालो होतो. पण काहीसा खट्टूही झालो होतो. सगळीकडून माझ्यावर दोषारोप व्हायचे. मी मुलांना बिघडवतोय. थोरांना नादाला लावतोय. उपयोग कमी आणि कोडकौतुक फार, असे अनेक आरोप माझ्यावर होत होते.

'“तसं पाहिलं, तर काही अंशी ते खरेच होते. मुलं अभ्यास किंबा महत्त्वाची कामं सोडून माझ्याशी खेळत बसायचे. अनेकदा तर माझ्या जवळच्या खेळांमध्ये बुडून जायचे. मोठी माणसेही माझा दुरुपयोग करीत होतीच. तासन्‌तास गप्पा मारणे, निरर्थक एसेमेस पाठवणे हे सर्रास चाले. रस्त्याने चालताना किंवा गाडी चालवताना माझ्या साहाय्याने बोलण्यामुळे अनेकदा गंभीर प्रसंग उद्भवले आहेत. मला कानाशी लावून रस्ता ओलांडताना किंवा रेल्वे रूळ ओलांडताना काहीजणांनी प्राण गमावले आहेत. काहीजणांनी अनेकांची बेअब्रू करण्यासाठी माझा वापर केला आहे. या सर्व बाबींमुळे माझी बदनामी खूप झाली. त्यामुळे मी दुःखी होतो. यात माझा काहीही दोष नव्हता, माझा वापर करणाऱ्यांचा मूर्खपणा याला कारणीभूत होता. तरीही मी आशावादी होतो. एक दिवस सत्य बाहेर येईल व माझी उपयुक्तता सिद्ध होईल, असा मला विश्‍वास वाटत होता. तसेच झाले.

“मित्रांनो, माझे किती उपयोग सांगू ? फेसबुकबद्‌दल तर मी तुम्हांला काही सांगण्याची गरजच नाही. आपल्या सर्व गुजगोष्टी मित्रमंडळींशी फेसबुकद्वारे तुम्ही करू शकता. अनेकांनी व्यवसायासाठी, राजकौय व सामाजिक प्रचारासाठी फेसबुकचा उत्तम उपयोग केला आहे. काही मोठे गुन्हे फेसबुकमुळे उघडकीला आले आहेत. फेसबुकप्रमाणे यु-ट्यूब, टम्बलर, पिंट्रेस्ट, लिक्‍इन यांसारख्या संकेतस्थळांचा वापरही उपयोगी ठरला आहे. आता तर 'व्हॉट्स्‌अऑप' हे अप्लीकेशन खूपच लोकप्रिय होत चालले आहे.

“तुम्ही तुमचे कागदपत्र, फोटो, व्हिडिओ स्वतःच जतन करू शकता, पाठवू शकता. इतके नव्हे, तर स्वतःच स्वतःचा चित्रपट तयार करू शकता. नोकरीसाठी आपण आपली माहिती पाठवतो, तशी माहिती तुम्ही स्वतःच कथन करतानाचे चित्रीकरण करून पाठवू शकता.

“ माझा उपयोग होऊ शकत नाही, अशा कामांची यादी करायची झाल्यास ती अगदी सहज शक्‍य आहे. कारण ती खूपच लहान असेल. “*तुम्हांला माहीत आहे का ? तुमच्या बँक खात्यात पैसे भरले, त्यातून काढले किंवा त्या खात्याशी संबंधित कोणताही व्यवहार घडल्यास त्याची बातमी मी तुम्हांला तत्क्षणीच पोहोचवतो. एवढेच नव्हे, तर तुम्हांला तुमच्या खात्यातून कोणालाही पैसे देण्यास मदत करू शकतो. हॉटेले, दुकाने यांना तर बिलांचे पैसे द्यायला मदत होतेच. पण अगदी रस्त्यावरच्या भाजीवाल्याचे पैसे द्यायलाही माझी मदत होऊ शकते. आता माझ्यामुळे तुमची बँक तुमच्या खिशात असेल. देशाच्या अर्थव्यवस्थेवर केवढा मोठा परिणाम होणार आहे, ते लक्षात घ्या.

HOPE THIS WILL HELP YOU

PLZ.. MARK THIS ANSWER AS BRAINLIEST

Similar questions