मोबाइल शाप की वरदान निबंध मराठी
please give answer
Answers
Answer:
मोबाइल शाप की वरदान
Explanation:
आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. या आधुनिक युगात महत्त्वाची भूमिका जो साकारत आहे तो म्हणजे आपल्या हातातील मोबाईल फोन. नवीन नवीन शोधामुळे मोबाईल फोन मध्ये सुद्धा वेगवेगळे परिवर्तन होत आहे. दर महिन्याला नवनवीन फीचर्स असलेले मोबाईल बाजारात येत आहेत. काहि वर्षाआधी मोबाईल फोन फक्त गप्पागोष्टी करण्यासाठी वापरला जायचं. परंतु आज इंटरनेट व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मोबाईल मध्ये अनेक गोष्टी करणे शक्य झाले आहे.
सुरुवातीला कीपॅड वाले मोबाईल यायचे, पण आता कीपॅड ची जागा टचस्क्रिन ने घेतली आहे. मोबाईलच्या आकार देखील वाढला आहे आणि खूप सारी माहिती इंटरनेटच्या द्वारे मिळत आहे. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्त्री-पुरुष सर्वांच्या हातात मोबाईल आहेत. मोबाइल कंपन्यांमध्ये वाढती प्रति स्पर्धेमुळे मोबाईल चे भाव कमी झाले आहे. इंटरनेट व कॉलिंग देखील भारतात अतिशय स्वस्त आहे.
आजचा मोबाईल खूपच स्मार्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये आपण घर बसल्या अनेक कामे करू शकतो. एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठवण्यासाठी आता बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या मोबाईलच्या एका क्लिकवर आपण पैसे पाठवू शकतो. काहीही खरेदी करण्यासाठी बाजारात जाण्याची देखील आवश्यकता नाही ऑनलाईन वेबसाईट च्या मदतीने घरबसल्या खरेदी करता येते. यासोबतच रेल्वे टिकीट बुकिंग, हॉटेल बुकिंग, फास्ट फूड, फ्लाईट बुक, रूम बुकिंग इ. कामे घरबसल्या करता येतात. कोणताही अतिरिक्त चार्ज न देता युट्युब वर मनोरंजन तसेच शिक्षणासाठी उपयुक्त व्हिडिओस पाहता येतात. व्हाट्सअप फेसबुक यासारख्या सोशल मीडिया ॲप्स च्या मदतीने नातेवाईक व मित्रमंडळींची संपर्क साधणे सोपे झाले आहे.
मोबाईल फोनमध्ये भरपूर सुविधा उपलब्ध आहेत. पण दुसरीकडे याचे दुष्परिणाम देखील आहेत. मोबाईलचे अत्याधिक दुष्परिणाम लहान मुले व तरुणांवर होत आहेत. मोठ्या आवाजात गाणे ऐकणे, दीर्घकाळापर्यंत मोबाईल वापरत राहणे, गेम्स खेळणे, सोशल मीडियाचा अती वापर करणे इत्यादी अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात नुकसान होत आहे. मोबाईल द्वारे ऑनलाईन बँकिंगची सुविधा मिळाल्याने बँक अकाउंट मधून पैसे चोरीसारख्या हॅकिंग च्या समस्या वाढल्या आहेत. मोबाईल फोनमध्ये वायरस पाठवून गोपनीय माहिती चोरी करणे असे कार्य देखील केले जात आहेत.
एकीकडे मोबाईलचे सकारात्मक प्रभाव आहेत तर दुसरीकडे त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. म्हणून मोबाईलचा कशा पद्धतीने सदुपयोग करावा हे वापरकर्त्यावर अवलंबून आहे.
please mark me as Brian list