मुंबई पुणे महामार्गावर बीशन अपगात या विषय वर (news writing)
Answers
Answer:
पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाट्याजवळ दोन कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली असून या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.आज दुपारच्या दरम्यान जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाट्याजवळ दोन कार समोरासमोर भरधाव वेगाने आल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. भर रस्त्यात हा अपघात झाल्यानं दोन्ही मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. पाऊस सरू असल्याने मदत कार्यात अडचण येत असल्याची माहिती आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी स्वीफ्ट एम. एच. १४ (पिंपरी-चिंचवड) तर पुण्याच्या दिशेने येणारी सॅन्ट्रो एम. एच. १२ (पुणे) पासिंग असलेल्या या दोन कारची समोरासमोर धडक झाली. स्वीफ्ट कार सॅन्ट्रो कारवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला. स्वीफ्टमधील ५ प्रवासी आणि सॅन्ट्रोमधील दोघे असे एकूण ७ जण जागीच ठार झाले आहेत.