मुंबई शहरामध्ये सण व उत्सव यांमध्ये विविधता का आढळते?
Answers
Answer:
मला नाही माहिती पण सण आणि उत्सव यांमध्ये काहीच विविधता नसते
Answer:
सण व उत्सव : सण व उत्सव या संस्था अतिप्राचीन काळा- पासून ते अर्वाचीन काळापर्यंत आणि आदिम समाजांपासून ते आधुनिक सुधारलेल्या समाजांपर्यंत जगातील सर्व समाजांत व राष्ट्रांत सर्व काळी अस्तित्वात असलेल्या दिसून येतात. ‘ सण ’ हा शब्द ‘ क्षण ’ ह्या संस्कृत शब्दावरून आलेला आहे. क्षण-छण-सण अशी त्याची व्युत्पत्ती देतात. ⇨ हेमचंद्रा च्या प्राकृत व्याकरणात छण म्हणजे उत्सव असा अर्थ दिलेला असून मेघदूत, दशकुमारचरित, श्रीमद्भागवत इ. संस्कृत गंथांतही उत्सव ह्या अर्थाने क्षण ही संज्ञा आढळते. सर्वदर्शनसंगहा त क्षण हा अमावास्या व पौर्णिमा ह्या तिथींचा वाचक असल्याचे म्हटले आहे तथापि सर्व सण हे उत्सवच होत. काही उत्सवांना सण ही संज्ञा मात्र देत नाहीत. नासिक येथे गुरूगह सिंह राशीत गेल्यानंतर वर्षभर गोदावरीच्या तिरी गोदावरीचा उत्सव चालतो. त्यास सण म्हणत नाहीत. प्रयाग येथे मकर मेळा व कुंभमेळा एक महिनाभर भरत असतो. तो गंगा-यमुनांच्या संगमांचा उत्सव असतो. तोही सण नव्हे. उत्सव म्हणजे सामुदायिक पूजा. ज्या पूजेत सामुदायिक रीतीने उपवास, पूजेनंतर सामुदायिक भोजन, नृत्य, गायन, भजन, कीर्तन, मैदानी खेळ व इतर क्रिडा ह्या गोष्टी किंवा यांपैकी काही गोष्टी चालतात व लोक त्यात उत्साहाने भाग घेतात, ती सामुदायिक पूजा होय. बरेचसे सण व उत्सव वर्षातून एकदा येतात. काही वर्षांपेक्षा अधिक अवधीने येतात. काही सण वा उत्सव कौटुंबिक, काही विशिष्ट कुल, विशिष्ट जात, विशिष्ट जमात, विशिष्ट धर्म व विशिष्ट राष्ट्र यांच्यापुरते मर्यादित असतात काही आंतरराष्ट्रीय असतात, परंतु सण व उत्सव यांचा विशिष्ट दिवस किंवा विशिष्ट कालखंड हे ठरलेले असतात.