Hindi, asked by lochanagrawal369, 1 month ago

माच २०२० ---- परा कालावधी ---- वयायाची परेची तयार ---- कोरोना वषाणचा ादभाव ---- सामािजक परिथती ---- वयायाची नराशा ---- नकाल ---- बोध​

Answers

Answered by sharmasarita2415
2

Answer:

परीक्षेची परीक्षा

मार्च २०२० उगवला आणि परीक्षा कालावधी असल्याने सारेच तयारीला लागले. मार्च महिना म्हटला, की शाळांमध्ये सुरू असते परीक्षांची धावपळ. विद्यार्थी परीक्षेची आतुरतेने वाट पाहत होते. विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी जवळपास पूर्ण झाली.

अशावेळी नेमकं जगभरातून कोरोना विषाणू प्रार्दुभावाच्या बातम्या येऊ लागल्या आणि एकामागोमाग शहर बंद झाले. कोरोना या रोगांवर कोणतेही औषध उपलब्ध नव्हते. त्यामुळे सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहरांमध्ये 'बंद' घोषित केला.

मग अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्वच सेवा बंद केल्या. शाळा बंद झाल्या. सुरू असलेल्या परीक्षा थांबवण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. कोणालाही काही कळत नव्हते. सामाजिक परिस्थिती अतिशय हालाखीची होती. 'जसा पावसाळा' हा ऋतू या धर्तीवर नियमित येतो 'तसेच नियमित येती परीक्षा असे समजून परीक्षा देणाऱ्या आणि त्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांची निराशा झाली. अनेक विद्यार्थी खूश होते. काही जणांची परीक्षा झाली, तर काही जण परीक्षेची वाट पाहत राहिले. कोरोनाने जणू परीक्षेची परीक्षा घेतली होती. विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली होती. आपण पास होणार की नापास? आपल्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार, की नाही या चिंतेत सारा विद्यार्थीवर्ग होता. अशातच निकाल जाहिर झाले. न झालेल्या विषयांच्या पेपरचे गुण सरासरी गुणांच्या आधारे देऊन निकाल देण्यात आला होता. अनेकांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. जवळपास सारे विद्यार्थी आनंदित होते.काहीजणांना, तर परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात संधी मिळाली होती. या साऱ्या परिस्थितीचा सामना केल्यावर एका गोष्टीचा बोध झाला, की निसर्गापुढे माणूस अगदी शून्य आहे. निसर्ग ही मानवाची निर्मिती नाही, तर मानव हा निसर्गाची निर्मिती आहे, मानवाला आपले स्थान या निसर्गाने दाखवून दिले. निसर्गावर विजय मिळवू पाहणाऱ्या माणसाला त्याने वठणीवर आणले.

तात्पर्य : निसर्गापुढे मानव शून्य आहे, त्याचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा मानवाचा विनाश पक्का आहे.

Similar questions