मी चित्रकार झाले तर
Answers
Answer:
मी मात्र चित्र काढण्यात मश्गुल! माझे मन चित्रकलेतच रमते. मला भविष्यात खूप चित्रे काढायला आवडतील.
मी जर चित्रकार झाले तर मला पृथ्वीवर उगवणाऱ्या सर्व वनस्पतींची चित्रे काढायला आवडतील. त्या आधी मी भाटकर सरांकडून बिंदु, रेषा, रंग, आकार यांचे मार्गदर्शन घेईन, त्या आधारे रेखांकन शिकेन. मला चित्रे अधिक चांगल्या त-हेने काढता यावीत म्हणून मी चित्र प्रदर्शने पाहीन. आई-बाबांबरोबर विविध ठिकाणी प्रवासाला जाईन, अर्थात तेथे मी निसर्गाचे निरीक्षण करीन..
निसर्गचित्रांप्रमाणेच मला लहान लहान बाळांची चित्रे काढायची आहेत. किती गोड दिसतात नाही! त्यांचे ते कोमल मृद् अंग! मी काढलेले बाळाचे चित्र पाहिल्यावर कोणालाही त्याच्या गालाला हळूच हात लावावा असे वाटले पाहिजे. माणसा- चीन बाळे कशाला ? कुत्रा, मांजर, हरिण यांचीही पिल्ले किती गोंडस असतात। हत्ती, पाणघोडा हे तर घबाडगे प्राणी. पण त्यांचीही पिल्ले कोमल, गोंडस दिसतात. या सगळ्यांचीच चित्रे मला काढायची आहे.
माझ्या आवडीप्रमाणे रंगवलेल्या चित्रांचे छोटेसे प्रदर्शन भरवावे, असे माझे स्वप्न आहे. शाळेत सगळेच माझ्या चित्रांचे कौतुक करतात. मला चित्रकलेतील अनेक बक्षिसेही मिळाली आहेत. मोठ्या कलादालनात आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवावे हे माझे स्वप्न तर आहेच; पण मी चित्रकार म्हणून ओळखली जावी हे माझे ध्येय आहे.
Explanation:
please Mark me as brainliest