Hindi, asked by pgolu2705gmailcom, 7 hours ago

मी चित्रकार कसा झालो । लेखक ब्रश कसा तयार करायचे​

Answers

Answered by bhumikapasi89
1

please write your question properly

Answered by totalgamer45
2

Answer:

मित्रमैत्रीणींनो, आज आपण मी चित्रकार कसा झालो हे या विषयावर निबंध बघणार आहोत.

लहानपणी मी खूपच घाबरट परंतु अभ्यासात हुशार होतो. शाळेत शिक्षकांनी दिलेले गृहपाठ मी नेहमी व्यवस्थित आणि सुंदर अक्षरात करायचो. इतर मुलांप्रमाणे माझे लक्ष एकमेकांच्या खोड्या करण्यात किंवा मैदानी खेळात तसें कमीच होते. शाळेतून घरी आल्यावर शाळेचा गृहपाठ झाला कीं मी शाळेत चित्रकलेच्या तासाला काढलेल्या चित्रांची वही बघायचो, किंवा छान छान गोष्टींची पुस्तके वाचायचो.

चित्रकलेचा तास मला खूप आवडायचा आणि सरांनी फळ्यावर काढलेली चित्रे तशीच्या तशी काढण्याचा मी ही प्रयत्न करायचो. शाळेत चित्रकलेचा तास आठवड्यातून एकदाच असे त्यामुळे तशी चित्रांची जास्त उजळणी करायला मिळत नसे. म्हणून घरी रोज मी माझ्या चित्रकलेची वही काढून त्या चित्रांची उजळणी करायचो. माझ्याकडील गोष्टीच्या पुस्तकात ही सुंदर सुंदर चित्रे होती. मी त्यामधीलही काही चित्रे काढण्याचा प्रयत्न करू लागलो. असे करता करता मी कधी त्या चित्रांच्या दुनियेत रमू लागलो मलाही कळलेच नाही.

दररोज काढत असलेल्या चित्रांमुळे माझी चित्रकला आता चांगलीच सुधारत चालली होती आणि ही गोष्ट हळू हळू शाळेतील चित्रकलेच्या सरांच्या लक्षातही येऊ लागली. त्यांनी मला अजून प्रोत्साहन दिले आणि मग आंतरशालेय चित्रकला स्पर्धेसाठी ते माझी विशेष तयारी करू लागले.

माझी चित्रकलेची ही गोडी एव्हाना माझ्या आई बाबांनाही उमजली होती. त्यांनीही माझ्यातील या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी मला पूर्ण पाठिंबा दिला. आईबाबांनी मला वेगवेगळ्या रंगाचे खडू, स्केचपेनस, आणि वॉटर कलर घेऊन दिले. आता हळू हळू माझ्याकडे शाळेची चित्रकलेची वही सोडून अनेक चित्रकलेच्या वह्या जमा झाल्या होत्या. ज्यात मी निरनिराळ्या वस्तूची, व्यक्तीची चित्रे काढायचे प्रयत्न करू लागलो.

शाळेतील सरांच्या मागदर्शनाखाली मी चित्र रेखाटण्याच्या सर्व कला हळू हळू आत्मसात करू लागलो. पेन्सिल शेडींग कसे करावे, एखाद्या वस्तूचे किंवा व्यक्तीचे चित्र कसे काढावे हया चित्रकलेमधील सगळे लहानसहान बरकावे मी शिकत होतो. एके दिवशी आंतरशालेय चित्रकला स्पर्धा होती तिथे सरांनी माझे नाव दिले होते. मी खूप मेहनत करून पूर्ण आवडीने त्या स्पर्धेमध्ये सुंदर चित्र काढले होते.

स्पर्धा होऊन दोन महिने झाले होते. मी अभ्यासातही हुशार होतो म्हणून स्पर्धेनंतर मी माझ्या अभ्यासात लक्षात केंद्रित केले. आणि असाच एक शालेय दिवस चालू असताना अचानक चित्रकलेच्या सरांनी मला बोलावून सांगितले कीं मी काढलेल्या चित्राला आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कधी एकदा घरी जाऊन आईबाबांनी ही गोड बातमी देतोय असे मला झाले होते. शाळेत मुख्याध्यपिकांनी आणि इतर शिक्षकांनी ही मला शाबासकी दिली त्याच बरोबर माझ्या वर्गातील इतर मुलांनीही माझ्यावर खूप कौतुकांचा वर्षाव केला.

मला मिळालेले हे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक म्हणजेच माझ्या चित्रांना मिळालेले हे प्रोत्साहन होते. कालांतराने मी अजून अजून प्रयत्न करीत चांगली चांगली चित्रे रेखाटण्याचा प्रयत्न करू लागलो. परंतु मी अभ्यासाकडे मात्र जराही दुर्लक्ष होऊ दिले नाही. पुढे जाऊन शालेय आणि आंतरशालेय अशा अनेक स्पर्धांमध्ये मी पारितोषिके मिळवीत गेलो आणि एक चांगला चित्रकार म्हणून माझी ओळख बनली होती. सुरुवातीला सरांनी फळ्यावर काढलेली चित्रे माझी आवड म्हणून मी घरी प्रयत्न करीत असतानाच ही चित्रकला कधी माझा आवडता छंद बनली मलाही कळलेच नाही.

प्रत्येकाने जीवनात कोणता ना कोणता छंद नक्कीच जोपासाला पाहिजे. कारण आपल्याला आवडणारी कोणतीही कला आपण जोपसली तर आपण नेहमी आनंदी राहतो. चित्रकलेची ही कला माझा छंद म्हणून मी जोपसली आणि आज मी एक चांगला चित्रकार झालो आहे. माझ्या आयुष्यात चित्रकलेने मला खूप आनंद आणि समाधान मिळते आणि तुम्ही सर्वांनीही तुम्हाला आवडेल असा कोणताही छंद जोपासा आणि जीवनात आनंद मिळवा.

मी चित्रकार कसा झालो हे आज मी तुम्हाला सांगितले आहे अशाच प्रकारे तुम्ही ही तुमच्यातील निरनिराळ्या कलांना नक्की वाव दया हीच माझी सदिच्छा आहे.

Similar questions