मी एक कष्टाळू शेतकरी निबंध लिहा
Answers
⠀⠀⠀⠀⠀⠀ मी एक कष्टाळू शेतकरी
मी एक छोटा शेतकरी आहे. माझ्याकडे खूप कमी शेती आहे. ही जमीन मला माझ्या वाडवडिलांकडून मिळाली आहे. माझे माझ्या जमिनीवर प्रेम आहे. मी आणि माझी बायको आमच्या जमिनीची खूप काळजी घेतो. आम्ही मशागत करतो. त्यामुळे आमची 'काळी आई आम्हांला उपाशी ठेवत नाही.
मात्र कितीही कष्ट केले, तरी संकटे चुकत नाहीत. मध्ये दोन वर्षे पाऊसच पडला नाही. पीक आले नाही. तेव्हा सरकारने सुरू केलेल्या दुष्काळी कामांवर आम्ही जात होतो. एका वर्षी बी-बियाण्यांत भेसळ निघाली. लावलेले पीक आलेच नाही. कष्ट वाया गेले!
कितीही कठीण वेळ आली, तरी मी सावकाराचे कर्ज काढत नाही. मला दारूचे व्यसन नाही. मला विडी-तंबाखूचेही व्यसन नाही. मी वारेमाप खर्च करत नाही. मी शेताच्या कडेला बांबू, बोरीबाभळी लावल्या आहेत. मी शेतात चिंचेची झाडे लावली आहेत. मला चिंचेचे थोडे पैसे मिळतात. शेतातील काही भागात मी फुलशेती करतो. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरतो. कष्टाला घाबरत नाही. त्यामुळे आमची उपासमार होत नाही.