India Languages, asked by lankeshweta, 6 months ago

मी फळा बोलत आहे मराठी निबंध

Answers

Answered by prathvi9978
3

Answer:

mark me as brainlist plz

Explanation:

तुम्ही मला आकाशात किंवा जमिनीवर नाही लावले. तुम्हीतर चक्क मला दोन खिळ्यांमध्ये त्रिशंकूसारखे अधांतरी टांगवले आहे. किती वषेर् झाली, मी इथेच आहे. कुठे जाता येत नाही, कोणाशीच बोलता येत नाही. दिवसा तुम्ही मुले शाळेत येतात व माझ्या मदतीने शिकता, तेव्हा किती आनंद होतो मला! परंतु रात्री मी या काळ्याकुट्ट खोलीत एकटाच असतो. रात्र जणू खायलाच येते मला! तेव्हा मी तुमची वाट पाहत असतो. कधी सकाळ होऊन तुम्ही शाळेत येता हे पाहण्यासाठी मोठ्या आतुरतेने तुमची वाट पाहतो. तुम्हापैकी किती जण वर्गात शिक्षक शिकवत असतात, तेव्हा मागे बडबड करीत असतात. शिक्षकाला मात्र हे सर्व पाहता येत नाही, पण मी हे सर्व पहात असतो... बरोबर ना दीपक?

कुणी माझ्या अंगावर गणित सोडवतात, कुणी संस्कृत संधी, समास लिहितात. शरीराचं सार्थक होत आहे, असं मला वाटतं. विज्ञानाचे शिक्षक माझ्यावर सुंदर आकृत्या काढतात. किती सुरेख असतात त्या! असे वाटते की कुणी कधी ते पुसूच नये. पण तुमचे इतिहासाचे शिक्षक आले की माझ्यावर जणू तोफांचा माराच होतो. ते जोरादर खडूचे फराटे माझ्या अंगावर उडवत असतात आणि तुम्हाला कारगिलची लढाई दाखवत असतात. त्यांनी माझ्या अंगावर नुसती भोकं पाडली आहेत.

माझा रंग काळा दिला आहे म्हणून मला खूप वाईट वाटते. पण मी असे ऐकले आहे की माझे काही बंधू आता गोरेदेखील आहेत. हे ऐकून बरे वाटते. कधी कधी माझ्यावर गुणवंत विद्यार्थ्यांची नावे लिहिली जातात. तेव्हा वर्गात पहिल्या आलेल्याचे अभिनंदन करावेसे वाटते. पण काय करू! मला हात नाहीत ना! मी असे ऐकले आहे की, आपल्या वर्गात शिकून गेलेले काही विद्याथीर् परदेशी डॉक्टर आहेत. ते ऐकून खूप अभिमान वाटतो मला.

पण मला तुमचा रागही येतो. का तुम्ही मला काळं बनवलं? का तुम्ही मला असं अधांतरी लटकवलं? पण मी एक निश्चय केला आहे. मराठीच्या तासाला बेडेकर सरांनी तुम्हाला अनंत काणेकरांच्या 'दोन मेणबत्त्या' पाठ शिकवला होता. तो मला खूप आवडला. त्यात ती मेणबत्ती म्हणाली होती की, ' तू जर स्वत:साठी जगलात तर मेलास, पण दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास!' हे वाक्य मला खूप आवडते. म्हणून मीही दुसऱ्यांसाठी जगण्याचं ठरवलंय. दुसऱ्यांची सेवा करण्यातच मला धन्यता वाटते.

Similar questions