मुंगी, नदी, कबूतर गोष्ट
Answers
Answer:
एकदा एक कबुतर नदीजवळच्या झाडावर बसले होते. त्याला एक मुंगी नदीच्या पाण्यात वाहुन जाताना दिसली. त्या मुंगीला पोहता येत नव्हते. ती बुडु नये म्हणुन धडपड करत होती. तिची धडपड पाहुन कबुतराला दया आली.
कबुतराने पटकन एक झाडाचे पान तोडले, आणि मुंगीकडे उडाले. त्याने ते पण मुंगीजवळ पाण्यात टाकले. मुंगी त्या पानावर चढली. पान तरंगत नदीच्या किनाऱ्याला लागले आणि मुंगीचा जीव वाचला. जमिनीवर येऊन तिने कबुतराचे आभार मानले.
काही दिवसांनी एक शिकारी बंदुक घेऊन जंगलात आला. जंगलात फिरताना त्याला झाडावर कबुतराचे घरटे दिसले. कबुतर आपल्या लहान पिल्लांशी खेळण्यात मग्न होते. त्याचे लक्ष शिकाऱ्याकडे नव्हते.
शिकाऱ्याने हळुच बंदुक वर काढुन कबुतराला मारण्यासाठी नेम धरला. पण मुंगीने त्याला असे करताना पाहिले आणि कबुतराला वाचवण्यासाठी शिकाऱ्याला जाऊन पायावर कडाडुन चावली.
शिकारी कळवळला आणि त्याच्या गोळीचा नेम चुकला. पायाची आग थांबवायला तो खाली बसुन पाय चोळु लागला. पण तेवढ्यात बंदुकीच्या आवाजाने कबुतर सावध झाले आणि उडून गेले.