India Languages, asked by kulkarniu503, 5 hours ago

मोगरा, निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच गुलाब; पण ह्या स्वारीचा रुबाब काही औरच असतो.
गुलाबासारखे सोपस्कार करून घेणारे झाड मी तर पाहिलेच नाही. गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही, पाणी
कमी झाले तरी त्याला सोसणार नाही नि अधिक झाले तरीही सोसणार नाही. त्याला खत वेळच्या वेळी मिळाले पाहिजे,
मुळे मोकळी झाली पाहिजेत, हंगाम साधून छाटणी केली पाहिजे, कीड टिपून मारली पाहिजे, एवढे सगळे करावे तेव्हा
हे राजेश्री फुलणार. एकदा गुलाब प्रसन्नपणाने फुलू लागला, की केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो. नव्हे, त्याचे
सारे श्रम भरून येतात. गुलाबाच्या फुलाची ऐट काय वर्णावी? किती त्याचे आकार, किती रंग, किती गंध! त्यांना सीमा
नाही. त्यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला! काळसर मखमलीसारख्यापाकळ्यांचे ते फूल म्हणजे एक
अजब चीज होती. सायलीची वेल एकदा आळे करून लावली, की मग तिच्याकडे फारसे लक्ष नाही दिले तरी चालते.
बाराही महिने ती फुललेली राहते. पारिजातक तर कमालीचा निरिच्छ. तो कोठेही लावा. त्याला पाणी द्या नाहीतर देऊ
नका. पावसाळी ढग आभाळात भरून आले आणि त्यातून अमृताचा शिडकाव सुरू झाला की ह्या रांगड्या झाडाला
कसला आनंद होतो कोणास कळे.

4 कती रचना
4 विरूद्धाथी
2 सामानाथी​

Answers

Answered by 91sandhyajadhav
1

i think this question is incomplete .?please give full questions.which can be understood me?

Answered by vaitysangita8
0

koi kam ka nahi hai ye aap

Similar questions