मी होणार उद्योजिका निबंध मराठी
Answers
Answer:
जगावं तर असं जगावं की, इतिहासाने आपल्यासाठी एक पान राखावं. प्रेरणेमध्ये खूप ताकद असते. माणसाच्या रोजच्या जगण्यामध्ये मोठे बदल घडवण्याची क्षमता प्रेरणेमध्ये असते, जगात मोठे बदल करायला प्रेरणाच कारणीभूत ठरते.
आपल्या मनाला उभारी देणारा, जिद्द, निर्धार, प्रेरणा जागवणारा, प्रयत्न केल्याने स्वप्नं पूर्ण होतात, असा आत्मविश्वास देणाचा प्रयत्न ‘परिवर्तन : एक बदल’ या अनोख्या उपक्रमातून केला जातो. उद्योगक्षेत्रात ज्यांनी यशाचं शिखर गाठलं आहे.
अशा कर्तृत्वान, अनुभवी व दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वांना एका मंचावर आमंत्रित करून आजच्या तरुणवर्गाला उद्योगक्षेत्रात येण्यासाठी मार्गदर्शन व प्रेरणा मिळावी, तसेच यशस्वी उद्योजकांना भेटण्याची, ऐकण्याची व त्यांच्याकडून उद्योगातील अनेक गोष्टी शिकण्याची तरुणवर्गाला संधी मिळावी या उदात्त हेतूने ‘परिवर्तन : एक बदल’ उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं.
दररोज जवळ जवळ ४० लाख लोकांपर्यंत पोहोचणारं एकमेव माध्यम हे वृत्तपत्र आहे. नेहमीच दुर्लक्षित राहिलेला वृत्तपत्र विक्रेता ‘परिवर्तन एक बदल’ आणि ‘कर्तव्य फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्र आला आहे. त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळावं, यासाठी परिवर्तन एक बदल आणि कर्तव्य फाऊंडेशन या सामाजिक संस्थांनी नेहमीच प्रयत्न केला आहे आणि पुढेही असाच उपक्रम चालू राहणार आहे.
‘मी उद्योजक होणारच’ या व्यासपीठाचं एक ध्येय आहे की मराठी तरुण आणि वृत्तपत्र विक्रेत्याला त्याची योग्य दिशा कळावी, त्याला व्यवसाय करण्यास नवीन संधी मिळावी, त्यांच्यात दडलेला उद्योजक जागरूक करावा. वृत्तपत्र विक्री करता करता भविष्यात नवीन व्यवसाय करण्याची संधी मिळावी म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांचे हे खूप मोठे संघटन परिवर्तन एक बदल आणि कर्तव्य फाऊंडेशनच्या नावाखाली गेल्या दोन वर्षात उभे राहिले आहे.
महाराष्ट्रातील मराठी उद्योजकतेला चालना किंवा एक प्रकारचं बळ देण्यासाठी तसंच प्रत्येक तरुणाला आजच्या काळाची गरज समजून देऊन त्याला तळागाळातून एक उद्योजक म्हणून ओळख मिळण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वात प्रथम उपक्रम आत्मविश्वासाचा असून ‘मी उद्योजक होणारच’ हा उपक्रम अनेक ठिकाणी मुंबईत आयोजित केला जातो.
या कार्यक्रमातून मराठी तरुण वर्ग व्यवसाय करू शकतात असा ठाम विश्वास जागरूक व्हावा, हा प्रयत्न असतो. मराठी तरुणांनी व्यवसायात येऊन मराठी उद्योजकतेला नवी दिशा मिळवून द्यावी, नावाजलेल्या मराठी उद्योजकांकडून नवीन संधी मिळावी याकरिता अनेक नामवंत उद्योजकांना व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची संधी एकाच वेळी हजारो तरुणांना मिळते.