म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेली युक्ती बाबत तुमचे मत लिहा
Answers
प्रश्न :-
म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेली युक्ती बाबत तुमचे मत लिहा.
उत्तर :-
एखादी निर्जीव वस्तू पोहोचती करावी, त्याप्रमाणे तो पोस्टमन पत्रे देत नसे. कारण पत्रे ही निर्जीव वस्तू नसतात. ती माणसाच्या सुखदुःखांनी, आशा-आकाक्षांनी भरलेली असतात. त्यात माणसाचे मन असते, ह्रदय असते. पत्राचे हे स्वरूप चित्रपटातल्या त्या पोस्टमनाने जाणले होते. म्हणून तो अंध म्हतारीला मुलाचे काल्पनिक पत्र वाचवून दाखवतो. ते पत्र खोटे असते. त्यातील मजकूर खोटे असते. त्या अंध म्हातारी च्या मुलाचा स्पर्श सुद्धा त्या पत्राला झालेला नसतो. पण म्हतारी सुखावते. तिचे उरलेले दिवस आनंदात जातात. या विपरीत स्थितीने पोस्टमनाचे मन कळवळते. पण म्हतारी सुखावणे हे अधिक मूल्य युक्त होते. आपल्या मुलाला ही तो पोस्टमन हीच शिकवण देतो. मुलातला माणूस जागा करतो. माणसाशी माणसासारखे वागण्याची ही महान शिकवण होती. प्रत्येक आई वडिलांनी मुलांना असे माणूसपण शिकवले पाहिजे. तरच मानवी समाजाला भविष्य आहे.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Explanation: