History, asked by Anonymous, 8 months ago

म्हाताऱ्या बैलाचे मनोगत write essay ​

Answers

Answered by ItsShree44
55

⠀⠀⠀⠀⠀⠀⠀म्हाताऱ्या बैलाचे मनोगत

मी आता थकलो आहे. त्यामुळे मी आता कोणतेच काम करत नाही. पण आजवर मी खूप कष्ट केले आहेत. माझा जन्म याच गोठ्यात झाला आहे. माझी आई तांबू सर्वांची खूप लाडकी होती. तिचा मी गोहा. त्यामुळे माझेही खूप लाड झाले.

खूप काळजी घेतली माझ्या मालकांनी माझी. माझे मालक मला रोज पौष्टिक खाणे देत. हिरवा चारा देत. त्यामुळे माझी चांगली वाढ झाली. मग मी शेतावर खूप काम करत असे. नांगर ओढत असे. कधी कधी मी घरातील गाडी ओढत असे. श्रम करून थकलो, तर माझे मालक मला गूळ खाऊ घालत.

पोळ्याच्या दिवशी तर माझा मोठा रुबाब असे. मला खूप सजवले जाई. माझी मिरवणूक काढत असत. आता मी म्हातारा झालो आहे. पण माझे मालक मला त्रास देत नाहीत. मी आता काहीही काम करत नाही. पण ते मला पूर्वीप्रमाणेच खाऊ घालतात. माझी देखभाल करतात, आजही पोळ्याच्या दिवशी मला ओवाळून पुरणपोळी मिळते खरोखर मी माझ्या मालकाला दुवा देतो.

Answered by vijaynagure5
4

Answer:

mi mahtar bailanchi manogat

Similar questions