Social Sciences, asked by brandamit2707, 7 months ago

माजूस स्वभावात .....
आहे​

Answers

Answered by Hemalathajothimani
1

Answer:

Explanation:

इतकेच नाही तर पायांवरून तो माणूस किती भाग्यवान आहे आणि त्यांचे भविष्य काय, हेही ओळखता येते. अंग ज्योतिषाच्या आधारे हे सारं जाणून घेता येतं. - साधारणपणे ज्या लोकांचे पाय I

Answered by Anonymous
4

Answer:

आपण जेव्हा एकाद्याबद्दल बोलतो कि याचा स्वभाव असा आहे...तसा आहे...तेव्हा आपण हे कशाच्या आधारावर बोलतो..त्याचं इतर लोकाशी व्यवहार करताना आढळून आलेलं वागणं.. त्याच्यातील षड् रिपूचं कमी जास्त प्रमाणात इतरांना होत असलेले दर्शन...त्यातून प्रदर्शित होणार संवाद-विसंवाद...वपुंनी काय म्हटलय कि कुठलाही माणूस हा कायमचा वाईट नसतो ...फक्त तो आपल्याला हवा तसं वागत नसतो..एवढंच ..आता हा स्वभाव बनतो कसा...जन्मजात तर कुठल्याही चांगल्या वा वाईट स्वभावाचं त्याला कवचकुंडल लाभलेलं नसतं...त्याच्या अज्ञानाच्या काळात तो एक माणसाचा चेहरा घेऊन असतो...मुक्त आणि स्वच्छंदी पाखरासारखा त्याचा विहार असतो...जसा जसा तो मोठा होत जातो ..स्वभोवतालच्या वातावरणात असणाऱ्या माणसाचं...त्यांच्या आपापसातील व्यवहारांचं....वागण्याचं...पावलो पावली त्याच्याकडून निरीक्षण...पृथ्थकरण ...अनुकरण होत असतं...मग त्या अनुकरणातून तो त्याच्या त्याच्या परीने त्याच्या सोयीचा अर्थ काढून स्वत:च्या आयुष्याची दिशा ठरवीत असतो...यालाच आपण संस्कार म्हणतो...आता हे संस्कार जसेच्या तसे स्वीकारले जातात ... त्यांची कसलीही ..कुठल्याही प्रकारे चिकित्सा केली जात नाही...कोण चिकित्सा करावयास लागला तर त्याला पाखंडी घोषित करून समाजातून बहिष्कृत केला जातो...मग या भीतीने आपण आहे तसा संस्काराचा देव्हारा ...त्याच्या पुजापाठाच्या अर्थ न उलगडणाऱ्या शब्दांच्या पाठांतरासह ...क्रियाकर्माच्या धूप- अंगाऱ्यासह रितीरीवाजाला पुढल्या पिढीच्या हातात देऊन कृतार्थ होत असतो...कितीही चांगले ते संस्कार असतील तरी ..कालबाह्ययतेच्या कसोटीवर आजच्या समाज जीवनात त्याचं मोल किती हे अजमावयास हवे...नि मग त्याचा जशास तसा स्वीकार वा त्याच्यावर काही संस्करण करून त्या संस्काराची पुनर्मांडणी कारवायास हवी...कारण परिवर्तन हा जीवनाचा गाभा आहे...सतत बदल हा ही जिवंतपणाचा ...चैतन्य शक्तीचा ...स्फुलिंगाचा अस्तित्व दर्शविणारा अविष्कार आहे...हजारो वर्षाच्या विश्वाच्या इतिहासाकडे नजर टाकली असता लक्षात येतं ...कि जो कोणी या बदलांना सामोरी जाताना नम्रपणे आपल्यातील बदलाला कबूल होऊन नव्या दिशांना दोन्ही बाहु उंचावून आलिंगन देण्यात यशस्वी झाला त्याचीच नाव काळाच्या भरती ओहोटीच्या लाटात सुखरूप तरुन गेली...जो आडमुठेपणा करीत राहिला त्याचं अस्तित्वच इतिहासजमा झालं...आता सारेच झालेले बदल हे काही मुल्यतेच्या कसोटीवर माणसाला अभिमान वाटावा असे मुळीच नाहीत.. कितीही कालच्या रम्य काळ्या पांढऱ्या रंगातील आठवणी..त्यांच्यातील ताजेपणा..भाबडेपणा...आपलेपणा...निरागसता...अस्सल गावठीपणा..प्रेमापोटीचा रानटीपणा आपल्याला आता खूणावत असला तरी कालाय तस्मै नम: म्हणून जिवंत राहण्यासाठी आज आपण तडजोडीचे पांढरे निशाण हाती घेतो|

Explanation:

Hope it helps❣️☺️

Similar questions