Science, asked by simi486, 1 year ago

माझी आई मराठी निबंध.... स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ​

Answers

Answered by Anonymous
10

hey mate here is your answer......... ☺✌✌

:आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई' होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय.एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आई ही शांतादुर्गा चे रूप आहे, जी प््ऐ मराठी भाषेतला "आई" हा शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. स्त्रीने जन्म दिला नसतानाही ती सवतीच्या मुलाची किंवा दत्तक मुलाची आई बनते.

आई मायेचा सागर आहे.या विषयावर अनेकांनी काव्ये आणि निबंध लिहिले आहेत. रामायणातील महानायक श्रीरामचंद्रानीही, स्वर्णमयी लंकेपेक्षाच काय, पण स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी अयोध्या श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे. ते म्हणतात, "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी". मराठीमध्येही आई या विषयावर अनेक कविता रचलेल्या आहेत. मराठीतील प्रसिद्ध कवी यशवंत यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगतात.स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.

hope it's help you dear..... ✌✌

Answered by ItsShree44
4

Answer:

रामायणात महर्षी वाल्मीकींनी रंगवलेले प्रभू रामचंद्र म्हणतात, 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि ।' खरोखर किती अचूक वर्णन आहे हे ! आईपुढे स्वर्गाचेही माहात्म्य थिटे पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, "इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी त्यांचे 'प्रसादपट' हे थिटे ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती विटत नाही.

माझी आईही अगदी अशीच आहे. आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच मला मिळाले आहे. परवाच शाळेतील विविध स्पर्धांत मला बक्षिसे मिळाली. माझे हस्ताक्षर हे सर्व विदयार्थ्यांच्या हस्ताक्षरापेक्षा उत्कृष्ट ठरले, याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईकडे जाते. लहानपणी अनेकदा मी लिहिलेल्या मजकुरातील हस्ताक्षर पसंत पडले नाही की आई मला तो परत लिहायला लावी. परत परत लिहिल्यामुळे माझे अक्षर घोटीव व वळणदार झाले. मला आठवतेय, मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक उलट्या व्हायला लागल्या. मी परीक्षेला घाबरायचो. कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो. आईने ओळखले, याला परीक्षेची भीती वाटते. मग पाचवीपासून तिने मला शालाबाह्य अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने. म्हणूनच मनात येते, 'न ऋण जन्मदेचे फिटे.'

माझ्या आईने माझ्यासाठी स्वत:च्या 'करीअर'चा कधीच विचार केला नाही. ती स्वतः एम्. एस्सी. असूनही मी लहान असताना तिने कधी नोकरीचा विचार केला नाही. मी आठवीत गेल्यावर तिने पीएच्. डी. केली, तीही शिष्यवृत्ती मिळवून. अभ्यास करतानाही ती घरातील सर्व कामे स्वत: करत होती.

याबाबत ती कोणकोणत्या स्पर्धांत भाग घ्यावा याकडे तिचे कटाक्षाने लक्ष असते. तिच्या वाचनात काही चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला सांगते; पण माझे निर्णय मीच घ्यावेत

आग्रही असते. खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती कष्ट उपसत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्माजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या मातेने ठसवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा.

आई हा थोर गुरू आहे. म्हणून तर बापूजी म्हणत, 'एक आई शंभर गुरूंहूनही श्रेष्ठ आहे.' आजच्या काळातील दहशतवाद, भ्रष्टाचार वगैरे समाजविघातक गोष्टींविषयी बोलत असताना परवा आई म्हणाली, “प्रत्येकाने लक्षात ठेवावे की,प्रत्येकालाच असते आई."

खरेच प्रत्येकाने आपल्या मातेच्या शिकवणुकीचा विचार केला तर हिंसकांचे हात हिंसा करताना थबकतील. आईने आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते, लहानपणापासून आईचा विरह ज्याच्या वाट्याला आला असेल, त्याचे केवढे दुर्भाग्य ! म्हणून कवी यशवंत म्हणतात

'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'

Similar questions
Math, 1 year ago