India Languages, asked by anjalipendam80071, 2 months ago

माझी आई निबंध मराठी 20 ओळी​

Answers

Answered by semore015
13

माझी आई खूप गोड आहे. ती दररोज सकाळी प्रथम उठते. माझी आई देवापासून आमच्यापर्यत घराघरातील प्रत्येकाची काळजी घेते. ती आजोबांची पूर्ण काळजी घेते. आजी सांगतात की माझी आई घराची लक्ष्मी आहे. मीही आईला देवाप्रमाणे मानतो आणि तिच्यातील प्रत्येक गोष्टीचे पालन करतो. माझी आईसुद्धा नोकरी सुद्धा करते. ती घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टींची जबाबदारी अगदी चांगल्या प्रकारे पार पाडतो. तीच्या कामाचे आणि स्वभावाचे कार्यालयात कौतुक केले जाते. माझी आई गोरगरिबांना आणि आजारी व्यक्तींना मदत करते.

माझी आई माझी जिवलग मित्र आहेमी चुकलो तेव्हा आई मला मार देत नाहीत तर त्याऐवजी प्रेमाने समजावून सांगते . जेव्हा मी दु: खी होतो तेव्हा माझी आई माझ्या मुरलेल्या चेहऱ्यावर हास्य आणते. तिचे प्रेम आणि प्रेमळ स्पर्शमुले मी माझे सर्व दुःख विसरून जातो .माझी आई देवीसारखी आहे. ती नेहमी मला आणि माझ्या बहिणीला नेहमी चांगल्या गोष्टी सांगते. माझी आई माझी आदर्श आहे

Please mark my answer as a brainlist

Answered by gaytribagul125
15

Answer:

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आई आईचे स्थान महत्त्वाचे असते जे शब्दांद्वारे सांगता येत नाही असे म्हटले जाते की देव प्रत्येकाबरोबर राहू शकत नाही, म्हणूनच त्याने आईची निर्मिती प्रत्येक घरात केली आहे. आई आपल्या जीवनात प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचे बारीक लक्ष ठेवून आपली काळजी घेणारी व्यक्ती असते. कोणत्याही व्क्तीगत फायदयाची जाणीव न ठेवता अहोरात आपल्या सेवेत आई सदैव असते .सकाळी ती खूप होताच प्रेमळपणे आम्हाला जागवते आणि रात्री ती गोड स्वप्नांसह कथा सांगते. आमची आई आम्हाला शाळेसाठी तयार होण्यास मदत करते आणि आमच्यासाठी न्याहारी आणि दुपारचे जेवण देखील करते. ती दुपारी दाराजवळ उभी राहून आमच्या शाळेतून परत येण्याची वाट पाहत असते आणि आमच्या शाळेच्या गृहकार्यात (होमवर्क) मध्ये देखील मदत करते.

आई आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिकेचे काम करत असते आणि आणि आपल्या जीवनामध्ये असलेल्या इतर लोकांपैकी ती आपल्यासाठी खूप अनमोल असते. आईचा संपूर्ण दिवस आपली मदत आणि गरज पूर्ण करण्यामध्ये व्यतीत होतो निस्वार्थ आणि मोकळ्या मनाने ती आपल्यावर प्रेम आणि मदत करते आईच्या प्रेमाची तुलना केल्या जाऊ शकत नाही आई म्हणजे आपल्या सोबत रहात असलेले ईश्वरी रूप आहे या जगात आई सगळ्यांना त्यापेक्षा वेगळी असते सुखदुःखात आपल्या संरक्षणासाठी आई नेहमी तत्पर असते. आई आपली प्रत्येक आवड-नावड याची जाण ठेवते. आपल्या विकास आणि प्रगतीसाठी आपल्याला प्रेरीत करते. आई आपली प्रथम गुरू असते जी आपल्याला आयुष्यात चालणे बोलणे संस्कार ह्या गोष्टी शिकवते आपल्याला योग्य आणि अयोग्य याची जाणीव करून देते आपल्या जीवनात योग्य शिस्त लावते देश समाज कुटुंब कर्तव्य आदर्श या गोष्टीचे महत्त्व समजावून सांगते.

या जगात जर देवाचे अस्तित्व बघायच असलं तर ते आपल्याला आपल्या आई मध्ये दिसते. दमल्यावर थकल्यावर आजारी असताना सुद्धा आई आपल्यासाठी नाश्ता जेवण पाण्याची बॉटल टिफिन ह्या सर्व गोष्टी तयार करून देते शाळेत सोडून सुद्धा देते.

दुपारचे सर्व काम आटपून झाल्यानंतर घड्याळाकडे बघत दरवाजाजवळ बसून घरी येण्याची वाट पाहते. आपल्यासाठी चमचमीत लज्जतदार मसाले दार चवदार जेवण बनवते. आपल्याला शाळेसाठी लागणाऱ्या प्रोजेक्ट आणि गृह पाठांमध्ये मदत करते. आईच्या प्रेमाची तुलना कधीच केली जाऊ शकत नाही. आपल्याला संस्कार आणि मूल्य क्षम बनण्यासाठी ऐतिहासिक गोष्टी सांगते आपल्या उज्वल भवितव्यासाठी नेहमी दक्ष असते आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आनंदाचा वर्षाव सतत ओसंडून राहावा म्हणून कार्यक्षम असते

आणि एवढं असतानासुद्धा कधीकधी आपण आईला दुःखी करतो परंतु तिच्या हसर्‍या चेहऱ्यामागे सुद्धा एक दुःख दडलेलं असतं जे आपल्याला समजत नाही म्हणून आपण प्रत्येकांनी आईची नेहमी काळजी घेतली पाहिजे

आई ही ममता आणि वात्सल्याची मूर्ती आहे, मुलाचे पहिले जग आईचे स्वतःचे जग असते, त्याच्या मांडीवर बसून, जगाचे नवीन रंग त्यांना दिसतात.आपण कितीही मोठे आहोत हे महत्त्वाचे नाही, कारण आईसाठी मुले नेहमीच लहान असतात, ती आपली कायम चिंता करते आणि आम्हाला योग्य मार्ग दाखवते. आई प्रत्येक आनंदात आणि दु: खामध्ये आपल्याबरोबर असते, जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा ती आमच्यासाठी रात्रभर जागी राहून आणि आपल्या प्रकृतीसाठी देवाची प्रार्थना करते. ती आमच्यासाठी सर्वकाही त्याग करते , आई भुकेलेली राहते पण आम्हाला जेवण देते , आईसारखा त्याग आणि प्रेम कोणीही करू शकत नाही. आई आपल्या प्रत्येक गोष्टीला समजते आपण तिला ती सांगो कि न सांगो ती आपल्या प्रत्येक आसुचे रडण्याचे कारण विचारते जर आपल्याला कोणती गोष्ट कठीण वाटत असली तर ती मार्गदर्शन करते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ती आपल्या सोबत असते


dishapanda38: BT
gaytribagul125: bye
dishapanda38: S...
gaytribagul125: what bt
dishapanda38: BT
dishapanda38: S..
gaytribagul125: nahi
dishapanda38: oh
dishapanda38: ok ok bye☺☺☺
gaytribagul125: tata
Similar questions