Hindi, asked by as7254390, 3 months ago

माझी आई वर निबंध in marathi​

Answers

Answered by shivansoni1000
3

Answer:

आई हा एक साधा सोपा शब्द पण किती माया दडली आहे या शब्दामागे. एक संपूर्ण जगच आहे आईमध्ये. जन्म देऊन जगात आणणारी आई एखाद्या देवाचे रूप आहे. लहानपणापासून आंजारून गोंजारून लाडाने खायला प्यायला देणारी आई प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवी असते. आजारी पडल्यावर एखाद्या डॉक्टर आणि नर्स दोन्ही होते. रात्र रात्रभर जागून आपली सेवा करते. कधी माया करते, कधी रागावते परंतु नेहमी निस्वार्थपणे फक्त आपल्याच भल्याचा विचार करते.

माझी आई सुद्धा अशीच सामन्य पण तरीही असामान्य आहे. लहानपणापासून बघितले तिला दिवस-रात्र घरात कष्ट करताना. पहाटे सर्वात आधी उठून स्वयंपाक घरात खुडबुड करणाऱ्या आईमुळे झोपमोड होते पण जेव्हा बिछान्यातून बाहेर येऊन ब्रश केल्यावर लगेचच समोर गरमागरम नाश्ता आणि वाफाळलेला चहाचा कप येतो तेव्हा उरल्यासुरल्या सुस्ती सोबतच चिडचिडेपणा निघून जातो. मग सुरु होते आईची धावपळ – आई अंघोळीसाठी पाणी काढ ना, आई माझे कपडे कुठे आहेत, डबा भरला का? मला नाही आवडत हि भाजी, बेसनची पोळी दे काढून. किती किती ऑर्डर्स एका पाठोपाठ एक. पण कधीही त्रागा न करता आई सर्व फर्माईशी पूर्ण करत असते. या मध्ये बाबांचे आणि आजीचे आदेश तर वेगळे असतातच. कुठून आणते आई एवढा सगळा उत्साह आणि शक्ती देव जाणे. मला तर सकाळी उठून शाळेत जायचे म्हटले तरी जीवावर येते. आभ्यास करणे म्हणजे खूप मोठी जबाबदारी वाटते.

एकदा आईला म्हटले सुद्धा, तुझ आयुष्य किती छान आहे, ना अभ्यासाची कटकट ना परिक्षेच टेन्शन ना रिझल्टची भीती. आई हसून बोलली तुला कोणी सांगिलत कि मला अभ्यास नसतो, दररोज सर्वांच्या आवडी निवडी प्रमाणे जेवण-नाश्ता बनविणे, तुमची सांगितलेली कामे लक्षात ठेवून करणे हे काही गृहपाठापेक्षा कमी आहे का? आणि परिक्षेच बोलाल तर माझी तर रोजच परीक्षा असते. आणि रोजच माझा रिझल्ट लागतो. माझा प्रश्नांकित चेहरा बघून हसून बोलली – आज भाजी चांगली नाही झाली, मीठ कमी आहे आमटीत, चटणी छान झाली आहे… तुम्ही सर्वजण वेळ न दवडता माझ्या कामाचे प्रगती पुस्तक देऊन मोकळे होतात.

खरच किती खरी गोष्ट आहे ना, आपण आपल्या खास मित्र-मैत्रिणींना सुद्धा इतक्या सहजपणे सांगत नाही कि ते चुकले आहेत, किंवा त्यांचं वागण बरोबर नाही, किती सावधानतेने त्यांचं मन न दुखवता त्यांच्याशी बोलतो पण आई, आईच्या मनाचा कधीच इतका खोलवर विचार करत नाही. आपल्या वागण्या बोलण्याने ती दुखावेल असा विचारही मनात येत नाही. किती गृहीत धरून चालतो आपण आईला. बाबांना राग येणार नाही याची काळजी घेतो, फ्रेंड्सना वाईट वाटणार नाही याचीहि काळजी घेतो. पण कधीही आईच्या मनाची काळजी करत नाही. कधी कधी तर इतरांचा रागही तिच्यावर काढतो पण ती एखाद्या संताप्रमाणे सारे काही सहन करते आणि वाट बघते तुमचा राग शांत होण्याची, आणि मग काहीही घडलं नसल्याप्रमाणे वागू लागते, अपेक्षा नाही करत की तुम्ही तुमची चूक कबूल कराल; तुमच्या माफी माग्ण्यापुर्वीच तुम्हाला माफ करून मोकळी झालेली असते.

माझी आई आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे याची मला कधी कल्पना हि नव्हती. किती सहजपणे आपली कर्तव्य पार पाडत आपली आवश्यकता बनून जाते. मला हे तेव्हा समजले जेव्हा एकदा माझी आई आजारी पडली. आई सोबतच संपूर्ण घर आजारी पडल्या सारखे वाटत होते. आई तापामुळे आणि डोकेदुखी मुळे हैराण झाली होती. बाबांनी तिला आराम करायला सांगितले आणि घराची जबाबदारी स्वतः उचलली. त्या दिवशी ना नाश्ता वेळेवर मिळाला ना जेवण. चवीचं तर विचारूच नका. घर आवरलं नसल्यामुळे अस्त्यावस्त पडले होते. किचनच्या सिंक मध्ये भांड्यांचा ढीग पडला होता. तीच स्थिती बाथरूमची सुद्धा झाली होती. असं वाटतच नव्हत की हे आपलं घर आहे. खूप प्रयत्न केला मी आणि बाबांनी सर्व आवरण्याचा पण कुठून सुरवात करावी आणि काय काय कराव हेच कळत नव्हत. माझी आई रोज एवढी काम करते की जी मला आणि बाबांना सुद्धा संपत नव्हती, आणि ती सुद्धा हसतमुखाने. त्यादिवशी पासून माझ्या आणि बाबांच्या मनात आई बद्दल आदर आणि प्रेम दुप्पटीने वाढले. मी तर मनापासून ठरवलं की आजपासून आईला जास्त काम सांगायची नाहीत. जेवढी जमतील तेवढी काम स्वतःच करायची. तिला तिच्या कामात सुद्धा शक्य तेवढी मदत करायची.

Similar questions