World Languages, asked by kartiksingh60, 1 year ago

माझी आजी पर निबंध इन मराठी​

Answers

Answered by 2105rajraunit
9

Answer:

माझी आज्जी

माझी आजी एका स्त्रीच्या रूपात एक निर्दोष आहे. सेवा आणि त्याग हे इतर जीवनाचे एकमात्र उद्दीष्ट आहे. अशा प्रकारे ती आमच्या कुटुंबात दावे आणि आज्ञा आणि आदर मिळण्यास पात्र आहे.

माझी आजी कुटुंबातील सर्वात व्यस्त सदस्य आहे. कौटुंबिक वाहनातील ती सर्वात महत्वाची चाक आहे. ती मुलांची देखभाल करणारी आणि काळजी घेणारी महिला आहे. ती एक धार्मिक महिला आहे. पहाटे होण्यापूर्वी उठल्यानंतर ती आंघोळ करते आणि प्रार्थना मध्ये आत्मसात करते. ती मंदिरात बसलेल्या मंदिरात बसून ती पवित्र पुस्तके वाचते आणि गायन गीताने पठण करते.

माझी आजी चांगली कुक आहे. तिला जेवण बनविणे आणि कुटुंबातील सदस्यांना मधुर जेवण देण्यास आवडते. ती संक्रमित होते, यंत्रासारखे कार्य करते. 1 PMM दरम्यान वेळ आणि 4 पी.एम. तिचे वय असूनही शिवणकाम आणि सुई काम करण्यासाठी राखीव आहे. ती एक निरोगी आणि निर्भय स्त्री आहे. ती घरातील प्रत्येक काम सांभाळते. म्हणून आम्ही तिच्यावर खूप प्रेम करतो. आम्ही सर्वजण तिचा सर्व बाबतीत कुटुंबाकडे सल्ला घेतो. अशाप्रकारे आमची कौटुंबिक कामे सुरळीत चालू आहेत, आपल्यापुढे कोणतीही अडचण नाही. आमच्यात भांडण होत नाही.

ती खूप दयाळू आणि विचारशील आहे. ती खूप काम करणारी आहे. ती आयुष्याचा एक क्षणही वाया घालवत नाही. ती या कामात किंवा त्या कामात नेहमी व्यस्त असते. अशा प्रकारे आमच्या कुटुंब तिच्या मार्गदर्शनाखाली झेप घेऊन वाढत आहे. ती आमची काळजी घेते. तिला दिखाऊ कपडे किंवा दागदागिने आवडत नाहीत. ती खूप पाहुणचार करणारी आहे. ती एक आदर्श आणि पवित्र महिला आहे. तिला मातृभूमीवर खूप प्रेम आहे.

Mark It As BRAINLIEST

Answered by ItsShree44
2

Answer:

बाबांना 'पारर्ख पारितोषिक' मिळाले होते आणि बाबांचा सत्कार समारंभ होता, म्हणून आजी सासवन्याहून आली होती. आज ती परत जायला निघाली होती. आम्ही तिला येथेच राहण्याचा खूप आग्रह करत होतो. पण ती मुळीच तयार नव्हती. आजी म्हणाली, "अरे नंदू, माझी खूप कामे रखडली आहेत तिकडे. हे बघ यापेक्षा आता ऑक्टोबरमध्ये तुला सुट्टी लागेल ना, तेव्हा तूच तिकडे ये. अरे, तुझी मदत होईल मला." आजीने माझी समजूत घातली आणि घराबाहेर पाऊल टाकले. आम्ही पाहतच राहिलो.

आजीने वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे; पण आजी थोडीही वाकलेली नाही. खरं सांगायचं तर गेल्या कित्येक वर्षांत आजीच्या शारीरिक ठेवणीत कोणताच बदल झालेला नाही. गेली वीस वर्षे आजीआजोबा त्या गावात राहत आहेत. चार वर्षांपूर्वी आजोबा वारले, तेव्हा वाटलं की आजी आता तरी आमच्या घरी शहरात येईल; पण उलट आजी गावातच अधिक गुंतत गेली.

माझे आजीआजोबा हे पहिल्यापासूनच आदर्शवादी. उत्कृष्ट गुणवत्ता असतानाही ते कधी पैशांच्या मागे लागले नाहीत; तर आयुष्यभर ते दोघेही कर्मवीर भाऊरावांच्या 'रयत शिक्षण' संस्थेत काम करत राहिले. संस्थेतून निवृत्त झाल्यावर ते सासवने गावात काम करत राहिले. सगळा 'निष्काम कर्मयोग' ! काम करणाऱ्याला कामांची उणीव कधीच भासत नाही, हे खरंच!

आजीआजोबांच्या भोवती सदा माणसांचा गराडा असे. आता आजोबा नाहीत. पण एकटी आजी गावाचे सगळे प्रश्न सोडवत असते. ती साऱ्या गावाची मोठी आई' बनली आहे. आजीच्या स्वत:च्या गरजा अतिशय मर्यादित आहेत. अगदी सकाळी लवकर उठून ती स्वत:चे सर्व आवरते. साडेआठ नऊला ती न्याहरी करते. न्याहरी म्हणजे भाकरी किंवा पोळी. कधी भाताची पेज. पण हेच आजीचे दिवसभराचे जेवण. ती एकभुक्त आहे. म्हणजे दिवसातून एकदाच जेवते. मधल्या वेळी एखादे फळ आणि रात्री फक्त कपभर दूध; मर्यादित खाणे हेच आजीच्या उत्तम प्रकृतीचे गमक असावे, असे मला वाटते.

आजी स्वत:साठी नित्याच्या स्वयंपाकाखेरीज खास काही करत नसली, तरी निरनिराळे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात तिचा हातखंडा आहे. त्यामुळे सुट्टीत आजीकडे गेलो की, चंगळ असते. दुसरी चंगळ असते, ती वाचनाची. आजीकडे उत्तम पुस्तकांचा संग्रह आहे. त्यामुळे मला मनसोक्त वाचन करता येते. आजीने गावाला अगदी वेगळेच रूप आणून दिले आहे. गावातील सर्व स्त्रिया आता स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. आजीने त्यांचे बचतगट स्थापन केले आहेत. आजी स्वतः कोणत्याही पदावर नसते; पण ती त्यांच्या मागे खंबीरपणे उभी असते. आजीच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनाचे हेच रहस्य असावे.

Similar questions