माझी आजी speech in Marathi
Answers
सगळ्या लहान मुलांसाठी त्यांचे पालक ही आवडीची गोष्ट असतात पण त्यापेक्षा त्यांना त्यांचे आजी अथवा आजोबा खूप जास्त आवडतात. ह्याचे मुख्य कारण महणजे आजी आजोबा मुलांवर खूप प्रेम करतात, त्यांच्या मागण्या पूर्ण करतात इत्यादी.
माझी आजी देखील अशीच गोड, प्रेमळ व माझ्या इच्छा पूर्ण करणारी आहे. तिचे नाव रमाबाई पाटील असे आहे. माझी आजी माझे खूप लाड करते आणि मे एकुलता एक असल्याने माझ्या सगळ्या गोष्टी ऐकते. ती स्वभावाने खूप चांगली आहे. तिचे वय ८५ आहे पण अजून सुद्धा ती अप्रतिम, स्वादिष्ट जेवण बनवते. तिच्या हाताच्या पुरणपोळ्या मला खूप आवडतात. आजी आजोबा मला महिन्यातून एकदा भेटायला येतातच तरी आता वय झाल्याने मीच त्यांच्याकडे जातो.
Answer:
बाबांना 'पारर्ख पारितोषिक' मिळाले होते आणि बाबांचा सत्कार समारंभ होता, म्हणून आजी सासवन्याहून आली होती. आज ती परत जायला निघाली होती. आम्ही तिला येथेच राहण्याचा खूप आग्रह करत होतो. पण ती मुळीच तयार नव्हती. आजी म्हणाली, "अरे नंदू, माझी खूप कामे रखडली आहेत तिकडे. हे बघ यापेक्षा आता ऑक्टोबरमध्ये तुला सुट्टी लागेल ना, तेव्हा तूच तिकडे ये. अरे, तुझी मदत होईल मला." आजीने माझी समजूत घातली घराबाहेर पाऊल टाकले. आम्ही पाहतच राहिलो.
आजीने वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे; पण आजी थोडीही वाकलेली नाही. खरं सांगायचं तर गेल्या कित्येक वर्षांत आजीच्या शारीरिक ठेवणीत कोणताच बदल झालेला नाही. गेली वीस वर्षे आजीआजोबा त्या गावात राहत आहेत. चार वर्षांपूर्वी आजोबा वारले, तेव्हा वाटलं की आजी आता तरी आमच्या घरी शहरात येईल; पण उलट आजी गावातच अधिक गुंतत गेली.
माझे आजीआजोबा हे पहिल्यापासूनच आदर्शवादी. उत्कृष्ट गुणवत्ता असतानाही ते कधी पैशांच्या मागे लागले नाहीत; तर आयुष्यभर ते दोघेही कर्मवीर भाऊरावांच्या 'रयत शिक्षण' संस्थेत काम करत राहिले. संस्थेतून निवृत्त झाल्यावर ते सासवने गावात काम करत राहिले. सगळा 'निष्काम कर्मयोग' ! काम करणाऱ्याला कामांची उणीव कधीच भासत नाही,
हे खरंच! आजीआजोबांच्या भोवती सदा माणसांचा गराडा असे. आता आजोबा नाहीत. पण एकटी आजी गावाचे सगळे प्रश्न सोडवत असते. ती साऱ्या गावाची मोठी आई' बनली आहे.
आजीच्या स्वत:च्या गरजा अतिशय मर्यादित आहेत. अगदी सकाळी लवकर उठून ती स्वत:चे सर्व आवरते. साडेआठ नऊला ती न्याहरी करते. न्याहरी म्हणजे भाकरी किंवा पोळी. कधी भाताची पेज. पण हेच आजीचे दिवसभराचे जेवण. ती एकभुक्त आहे. म्हणजे दिवसातून एकदाच जेवते. मधल्या वेळी एखादे फळ आणि रात्री फक्त कपभर दूध; मर्यादित खाणे हेच आजीच्या उत्तम प्रकृतीचे गमक असावे, असे मला वाटते. आजी स्वत:साठी नित्याच्या स्वयंपाकाखेरीज खास काही करत नसली, तरी निरनिराळे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात तिचा हातखंडा आहे. त्यामुळे सुट्टीत आजीकडे गेलो की, चंगळ असते. दुसरी चंगळ असते, ती वाचनाची. आजीकडे उत्तम पुस्तकांचा संग्रह आहे.
त्यामुळे मला मनसोक्त वाचन करता येते. आजीने गावाला अगदी वेगळेच रूप आणून दिले आहे. गावातील सर्व स्त्रिया आता स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. आजीने त्यांचे बचतगट स्थापन केले आहेत. आजी स्वतः कोणत्याही पदावर नसते; पण ती त्यांच्या मागे खंबीरपणे उभी असते. आजीच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनाचे हेच रहस्य असावे.