India Languages, asked by curiosityexploded, 5 months ago

'माझी आजी' या विषयावर 7 ते 8 ओळींत तुमचे विचार लिहा.​

Answers

Answered by prajapatirajendra672
3

Answer:

आमच्या घरातील माझे खरे दैवत म्हणजे माझी आजी. माझी आजी रोज पाहते लवकर उठते. एकीकडे तोंडाने ती भूपाळी, लोक वगैरे म्हणत असते. सर्वांच्या आधी आंघोळ करून देवपूजा करते तिच्या गोड आवाजातील श्लोक ऐकायला खूपच बरे वाटते.

आजीचे वय ६५ वर्षे आहे पण अजूनही आजीची तब्येत चांगली आहे. ती कधी कधी स्वस्थ बसत नाही. तिथे काहीना काही काम सुरूच असते. आई-बाबा कामाला गेल्यावर ती आमची नीट काळजी घेते. शेजारीपाजारी सर्वांना आजी नेहमीच मदत करत असते. रोज संध्याकाळी की देवळात जाते. कधीकधी भजनासाठी जाते. संध्याकाळी दिवे लागण्याच्या आधी आम्ही मुलांना घरी परत आले पाहिजे अशी तिची शिस्त असते. मंकी आम्हाला परवाचा श्लोक म्हणायला लावते. रामायण, महाभारत, शिवाजी महाराज त्याच्या कितीतरी गोष्टी ती आम्हा मुलांना अगदी रंगवून सांगते. जणू काही त्यांच्याकडे गोष्टीचा खजिनाच आहे असे मला वाटते.

Similar questions