Math, asked by PratyakshVyas1284, 1 year ago

माझा आवडता छंद चित्रकला

Answers

Answered by NamdevAnjana
34

माझा आवडता छंद : चित्रकला

आपल्यातील प्रत्येकजण कुठला ना कुठला छंद असतोच. त्याचप्रमाणे मला चित्रकाल आवडते. एकतर चित्रकला फार खर्चिक नसल्याने कधीही काढता येतात आणि दुसरे म्हणजे ती फार मजेशीर गोष्ट आहे. नवनवी माणसं, प्रसंग, सणवार त्यातून चित्रित करता येतात.  

मी अगदी लहान असल्यापासूनच चित्र रेखाटतोय. मात्र, सुरूवातीला डोंगर-दऱ्या, बाहुला-बाहुली, व्यंगचित्र अशा गोष्टींपर्यंत माझी चित्रकला मर्यादित होती. मात्र कालांतराने मला नवनवीन चित्र काढता येऊ लागली. सुरूवातीला सहा-सात रंगांच्या पलिकडे फारसे मी रंगही वापरत नसे. आता बाराहून अधिक रंगांचा योग्य तिथे वापर करतो.

चित्र काढत असताना आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. वेगवेगळ्या गोष्टींची कल्पना करून आपल्याला चित्र रेखाटता येतात आणि चित्रकलेची हीच गोष्ट मला सर्वाधिक आवडते.

माझे आई-बाबा, आजी-आजोबा तसेच ताईसुद्धा माझ्या चित्रांचं भरभरून कौतुक करतात. त्यावेळी खरंतर मला चित्र काढायला आणखी प्रोत्साहनच मिळतं.

माझ्याकडे अभ्यासाव्यतिरिक्त ज्यावेळी रिकामा वेळ असतो, त्यावेळी ड्रॉईंग पेपर, पेन्सिल, रंग घेऊन मी चित्र काढत बसतो. यामुळे माझा सरावही होतो.  

चित्रकलेने माणूस आणखी तल्लख बनतो, असे माझे आई-बाबा सांगतात. कारण चित्र काढत असताना आपण त्या चित्राचा विविध बाजूने विचार करत असतो. त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला आणि बुद्धीला चालना मिळते.

Similar questions