माझा आवडता छंद essay in marathi
Answers
Answer:
माझा आवडता छंद
मुद्दे : छंद म्हणजे काय? – तुमचा आवडता छंद कोणता?- तो तुम्हांला कसा- जडला? – त्यापासून होणारे फायदे.]
छंद म्हणजे माणसाच्या जीवनातील विरंगुळा !
एखादी गोष्ट पुन:पुन्हा मनापासून करायला आवडते आणि या आवडीचे छंदात
म रूपांतर होते. छंद म्हणजे नाद. पोस्टाची निरनिराळी तिकिटे जमवणे हा माझा आवडता छंद आहे.
गेल्या वर्षी माझ्या वाढदिवसाला माझ्या मावशीने मला एक तिकिटांचा संग्रह भेट दिला. त्यात चौकटींमध्ये विविध देशांची तिकिटे सुबकपणे लावलेली होती. हा संग्रह मिळाल्यापासून मला विविध प्रकारची व दुर्मिळ तिकिटे जमवण्याचा छंद जडला.
माझा अभ्यास करून झाला की हा संग्रह मी घेऊन बसतो. तो न्याहाळताना मला व अतिशय आनंद होतो. मी निरनिराळ्या देशांची तिकिटे गोळा केली आहेत. त्यासाठी विविध देशांतील मित्रांशी मी पत्रमैत्री केली आहे. त्यामुळे तिकिटांच्या संग्रहाबरोबरच मला अनेक
देशांची माहितीही मिळते. म्हणून मला माझा छंद खूप आवडतो.
thanks ❤❤
छंद म्हणजे नेहमी जोपासलेली आवड. प्रत्येकाला वेगळा वेगळा छंद असतो.
मला आहे
वाचनाचा छंद. लहानपणीच मला
वाचनाचा नाद लागला. नेमका कसा
व केव्हा हा नाद मला लागला हे मला आठवत नाही.
आमच्या शाळेत वाचनालय होते. जेवनाच्या सुट्टीत,
खाली तासात आम्ही मित्र तिथे जायचो व जे मनाला वाटेल ते वाचायचो. कधी वर्तमान पत्र
तर कधी मासिक. यामुळे वाचनाची ओढ वाढतच गेली.
वाचनालयातून आम्हाला प्रत्येक आठवळ्यात दोन
गोष्टींच्या पुस्तका मिळायच्या. ती वाचून त्या गोष्यीचा सारांश आम्हाला आमचे सर
वर्गात विचारायचे. आणि त्याकरता आम्ही गोष्टीच्या पुस्तका वाचायला शिकलो आणि तोच
माझा छंद झाला असेल कदाचित.
माझ्या या वाचनाचा छंद बाबांना कळला व त्यांनी
मग गावातील
सार्वजनिक वाचनालयात देखील माझ्या नावाचा
खाता उघडला. मग काय, नेहमी माझ्या हातात पुस्तकच दिसायला लागले. पण या छंदामुळे मी
कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही केलय. आधी शाळेचा अभ्यास संपवायचा आणि मग जे हव ते
वाचायच.