माझा आवडता छंद in marathi
Answers
माझा आवडता छंद
छंद म्हणजे नेहमी जोपासलेली आवड. प्रत्येकाला वेगळा वेगळा छंद असतो. मला आहे वाचनाचा छंद. लहानपणीच मला वाचनाचा नाद लागला. नेमका कसा व केव्हा हा नाद मला लागला हे मला आठवत नाही.
आमच्या शाळेत वाचनालय होते. जेवनाच्या सुट्टीत, खाली तासात आम्ही मित्र तिथे जायचो व जे मनाला वाटेल ते वाचायचो. कधी वर्तमान पत्र तर कधी मासिक. यामुळे वाचनाची ओढ वाढतच गेली.
वाचनालयातून आम्हाला प्रत्येक आठवळ्यात दोन गोष्टींच्या पुस्तका मिळायच्या. ती वाचून त्या गोष्यीचा सारांश आम्हाला आमचे सर वर्गात विचारायचे. आणि त्याकरता आम्ही गोष्टीच्या पुस्तका वाचायला शिकलो आणि तोच माझा छंद झाला असेल कदाचित.
माझ्या या वाचनाचा छंद बाबांना कळला व त्यांनी मग गावातील सार्वजनिक वाचनालयात देखील माझ्या नावाचा खाता उघडला. मग काय, नेहमी माझ्या हातात पुस्तकच दिसायला लागले. पण या छंदामुळे मी कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही केलय. आधी शाळेचा अभ्यास संपवायचा आणि मग जे हव ते वाचायच.
वाचनाचा छंदामुळे मला कधीच कंटाळा येत नाही. प्रवासात जाताना तर पुस्तकच माझे सोबती असतात. या छंदामुळे मला जगात घडत असणारी सर्व घटनांची माहिती मिळते. माझा ज्ञानात ही वृद्धी होत असते.
माझ्याकडे सर्वप्रकारच्या पुस्तकांचा संग्रह झालेला आहे. त्यात गोष्टीच्या पुस्तका, मासिक, कांदबरी व खुप काही वाचन सामग्री आहे. मला केवळ मराठीतील नाही तर हिंदी व इंग्रजी पुस्तक सुद्धा वाचायला आवडते.Answer:
छंद म्हणजे काय? आपल्या मोकळ्या वेळातला विरंगुळा. तशा माझ्या विरंगुळ्याच्या खूप गोष्टी आहेत; जसे संगीत ऐकणे, क्रिकेट खेळणे, टीवी पाहणे, चित्रकला आदी. पण माझा आवडता छंद आहे वाचन. तसे वाचन हे कंटाळवाणे समजले जाते आणि माझ्या वयाची मुले-मुली तर वाचणं पूर्णपणे टाळतात. वाचन मला ऐवढे आवडते की मी फक्त ते फावल्या वेळेत करत नाही तर त्याच्यासाठी अभ्यास, खेळ, प्रकल्पांमधून वेळ काढतो. सर्वसाधारणपणे वाचनाच्या छंदाबद्दल खूप गैरसमज आहेत. वाचन हे कंटाळवाणा मानले जाते. वाचन म्हणजे फक्त पाठ्य पुस्तक वाचणे नाही. तुम्ही करमणुकीसाठी कॉमिक्स वाचू शकता, विविध प्रकारच्या कादंबऱ्या सुद्धा आहेत, गोष्टींची पुस्तके, विविध मॅगझिन्स आणि भरपूर काही. कुणाला काव्यवाचन आवडू शकते तर कोणाला मराठी साहित्य आवडू शकते. मला मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी साहित्य, गोष्टी,आर्टिकल्स, ब्लॉग वाचायलाही आवडते. अजून एक गैरसमज जो मुलांना वाचनाच्या छंदापासून परावृत्त करतो तो म्हणजे आपण जे वाचतो ते पाठ करायचे असते. हे सरासर चुकीचे आहे. वाचन जर छंद असेल तर तो अभ्यास किंवा कामासारखा वाटला नाही पाहिजे. वाचन हे मजा म्हणूनही करता येऊ शकते, त्यातून निराळ्या प्रकारचा आनंद मिळतो.
Continue reading at माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध, भाषण, लेख My Hobby Marathi Essay | TeenAtHeart