Hindi, asked by ashishkapeya75140, 1 month ago

माझा आवडता छंद
मराठी निबंध लेखन​

Answers

Answered by amar2006comh
5

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध | Maza Avadta Chand Vachan Essay in Marathi

जगभरामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींनी द्वारे वेगवेगळ्या छंदाची जोपासना केली जाते. प्रत्येकाचा आवडता छंद हा वेगवेगळा असू शकतो. त्याप्रमाणे माझा आवडता छंद म्हणजे वाचन आहे.

मला वाचायला खूप आवडते. वाचन हा माझा आवडता छंद आहे. वाचनाची आवड मला हे आत्तापासून असून नाही तर लहानपणापासूनच आहे. आजच्या जगात ज्ञानाला सर्वात मोठी शक्ती समजली जाते. म्हणूनच वाचनाचे महत्व देखील खुप आहे. म्हणून मी‌ वाचनाची आवड जोपासली आहे.

मला वाटते की, इतर गोष्टींमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा वाचनातून ज्ञान मिळवीत असतो.

वाचन माणसाला कमी वेळेमध्ये आणि कमी वयामध्ये खूप ज्ञान मिळवून देऊ शकते. नेहमीच वाचन केलेले बुद्धितीचा विकास हा खूप लवकर होतो. तसेच वाचनामुळे मानसिक विकास होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

आपल्या देशातील प्रत्येक महान आणि यशस्वी व्यक्तींचे चरित्र वाचले तर आपल्याला दिसून येईल की, या प्रत्येक व्यक्तीला वाचनाची खूप आवड होती. जर तुमचे वाचन अफाट असेल तर तुमच्याकडे सर्व प्रकारचे असू शकते. याच ज्ञानातून आपण आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्यावर सहजपणे मात करू शकतो. कुठल्याही प्रकारची अडचण असली तरी त्यावर उपाय शोधून त्यावर मात करण्याची ताकद वाचनातून मिळते.

मला लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड आहे तसेच माझ्या बाबांना देखील वाचनाची आवड आहे. कदाचित बाबांन मुळेच माझ्या मध्ये वाचण्याची आवड निर्माण झाली असावी.

ज्यावेळी बाबा वाचन करत असेल त्या वेळी मी बाबांच्या शेजारी जाऊन त्यांचे वाचन शांतपणे ऐकत होते. त्यातून मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळाले व हळूहळू मीदेखील वाचनाला सुरुवात केली. आणि आज वाचन हा माझा आवडता छंद आहे.

माझ्यातील

Similar questions