Hindi, asked by nehalodha4034, 1 year ago

माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध

Answers

Answered by rutikaher36
4

Answer:

माझा आवडता छंद

छंद म्हणजे नेहमी जोपासलेली आवड. प्रत्येकाला वेगळा वेगळा छंद असतो. मला आहे वाचनाचा छंद. लहानपणीच मला वाचनाचा नाद लागला. नेमका कसा व केव्हा हा नाद मला लागला हे मला आठवत नाही.

आमच्या शाळेत वाचनालय होते. जेवनाच्या सुट्टीत, खाली तासात आम्ही मित्र तिथे जायचो व जे मनाला वाटेल ते वाचायचो. कधी वर्तमान पत्र तर कधी मासिक. यामुळे वाचनाची ओढ वाढतच गेली.

वाचनालयातून आम्हाला प्रत्येक आठवळ्यात दोन गोष्टींच्या पुस्तका मिळायच्या. ती वाचून त्या गोष्यीचा सारांश आम्हाला आमचे सर वर्गात विचारायचे. आणि त्याकरता आम्ही गोष्टीच्या पुस्तका वाचायला शिकलो आणि तोच माझा छंद झाला असेल कदाचित.

माझ्या या वाचनाचा छंद बाबांना कळला व त्यांनी मग गावातील सार्वजनिक वाचनालयात देखील माझ्या नावाचा खाता उघडला. मग काय, नेहमी माझ्या हातात पुस्तकच दिसायला लागले. पण या छंदामुळे मी कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही केलय. आधी शाळेचा अभ्यास संपवायचा आणि मग जे हव ते वाचायच.

वाचनाचा छंदामुळे मला कधीच कंटाळा येत नाही. प्रवासात जाताना तर पुस्तकच माझे सोबती असतात. या छंदामुळे मला जगात घडत असणारी सर्व घटनांची माहिती मिळते. माझा ज्ञानात ही वृद्धी होत असते.

माझ्याकडे सर्वप्रकारच्या पुस्तकांचा संग्रह झालेला आहे. त्यात गोष्टीच्या पुस्तका, मासिक, कांदबरी व खुप काही वाचन सामग्री आहे. मला केवळ मराठीतील नाही तर हिंदी व इंग्रजी पुस्तक सुद्धा वाचायला आवडते. 

Read more on Brainly.in - https://brainly.in/question/2025978#readmore

Answered by Anonymous
9

⠀⠀⠀⠀⠀माझा आवडता छंद वाचन

असा धरी छंद। जाई तुटोनिया भवबंधा' आपल्या संत महात्म्यांची ही शिकवण आहे. माणसाला कुठला ना कुठला तरी छंद हा हवाच ! कारण त्यामुळे त्याला रोजच्या चाकोरीबद्ध जगण्याचा कंटाळा येत नाही. छंद नाना प्रकारचे असतात. काही छंद खुप खर्चिक असतात, तर काही जणांचे छंद हे इतरांना त्रासदायक ठरतात. 'राजा केळकर म्युझियम' उभारणाऱ्या केळकरांना नाना गोष्टींचा संग्रह करण्याचा छंद होता, त्यांतून 'राजा केळकर संग्रहालय' ही फार मोठी राष्ट्रीय संपत्ती निर्माण झाली. अभिनेते चंद्रकांत मांढरे आपल्या फावल्या वेळात सुंदर निसर्गचित्रे काढत. आज त्यांच्या या छंदातून देशाला एक रम्य 'आर्ट गॅलरी' उपलब्ध झाली.

'वाचन' हा असाच एक उपयुक्त छंद आहे. पण या छंदाची ओळख अगदी लहानपणीच व्हायला हवी. एकदा भाषेतील अक्षरांची ओळख झाली की माणसाला वाचायला येऊ लागते. मला आठवतेय, जेव्हा आपल्याला प्रथम वाचायला येते, तेव्हा आपल्याला किती विलक्षण आनंद होतो! मग दिसतील ते शब्द आपण वाचू लागतो. रस्त्यावरच्या पाट्या, पुडी म्हणून आलेले कागद सगळे आपल्या नजरेखालून जातात.

वाचनाचा छंद आपल्याला लागायला कुणीतरी कारणीभूत होत असते. कधी आपली आई आपला हा छंद जोपासत असते, तर कधी आजी निमित्त होते. एखादे शिक्षक त्या बालवयात वाचनाचे वेड आपल्याला लावतात आणि मग आपण वाचतच राहतो.

ज्ञान हे अगाध आहे. त्याला एक जन्म पुरणार कसा ! मग वाचक आपली आपली आवड ठरवतो. त्या प्रकारचे जास्तीत जास्त वाचन करतो. वाचनाने ज्ञानप्राप्ती होते आणि मनोरंजनही होते. वाचन माणसाला मोठे करते. त्याचे मन विशाल करते. वाचताना आधीव्याधींचा विसर पडतो. आपण एका वेगळ्याच जगात जातो. मग तो 'हॅरी पॉटर' असला तर आपण त्याच्याबरोबर अद्भुत जगात शिरतो. 'गोट्या' असला तर गरिबांचा विचार करू लागतो.

वाचनाचा छंद जोपासताना आपल्याला ग्रंथालयाचे साहाय्य मिळते. तरीपण काही आवडलेली पुस्तके आपण स्वतः खरेदी करून संग्रही ठेवतो. वाचनाचा छंद असलेल्याला कधीच कंटाळा येत नाही. प्रवासात, एकटे असताना, अगदी दुःखाच्या प्रसंगीही पुस्तके साथ करतात. कदाचित मित्र कंटाळा करील; एक वेळ आईवडीलही थकतील. पण पुस्तक कधी कंटाळा करत नाही, थकत नाही. आपल्याला जेव्हा हवी तेव्हा, जिथे हवी तिथे साथ करायला पुस्तके तयार असतात. वाचन आपल्याला बहुश्रुत करते, समृद्ध करते. विशाल जगाचा परिचय करून देते. 'ग्रंथ हेच सर्वश्रेष्ठ गुरू होत', असे एका सुभाषितकाराने म्हटले आहे, ते उगाच नाही. म्हणूनच वाचनाचा छंद प्रत्येकाने जोपासला पाहिजे. .

Similar questions