माझा आवडता छंद - या ववषयावर निबंध लिहा.
Answers
Answer:
माझा आवडता छंद
काही दिवसांपूर्वी आमच्या शहरात साहित्यसंमेलन झाले होते. त्यानिमित्ताने पुस्तक-जत्रा भरली होती. तेथेच एक प्रदर्शन मला पाहायला मिळाले. श्री. राम देशपांडे यांनी अनेक थोर व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या होत्या. त्यांच्या त्या वेगळ्या छंदाचे प्रदर्शन होते. त्यांतील कित्येक थोर व्यक्ती आज जिवंत नव्हत्या. पण त्या स्वाक्षरीरूपाने भेटल्याचे समाधान वाटत होते.
आपणही हा छंद जोपासायचा असे मी ठरवले. मी बाबांना माझी कल्पना सांगितली. त्यांनाही ती आवडली. त्यांनी मला स्वाक्षरी घेण्यासाठी एक सुंदर वही आणून दिली. त्यांनी मला एक अट घातली. ज्या व्यक्तींची स्वाक्षरी हवी असेल, त्यांची सर्व माहिती मिळवायची. मगच स्वाक्षरी घ्यायची. थोड्याच दिवसात आमच्याच शहरात एक रणजी सामना आयोजित केला गेला. माझे बरेच आवडते खेळाडू त्या सामन्यासाठी शहरात येणार होते. मी त्यांची माहिती गोळा केली. मला बऱ्याच क्रिकेटपटूच्या स्वाक्षऱ्या मिळाल्या.
मामाएकदा बाबांच्या कचेरीत होणाऱ्या समारंभाला माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आले होते. बाबा मला त्या समारंभाला घेऊन गेले होते. समारंभापूर्वी त्यांनी तेथे जमलेल्या बाळगोपाळांशी संवाद साधला. माझ्याशी गप्पा मारताना त्यांनी माझी सर्व चौकशी केली व मला स्वाक्षरी दिली. नंतर एका गाण्याच्या कार्यक्रमात मला संगीतकार अवधूत गुप्ते, देवकी पंडित, साधना सरगम यांच्याही स्वाक्षऱ्य