World Languages, asked by sanjay1234567890, 1 year ago

माझं आवडतं फूल निबंध.

Answers

Answered by soham9905
37
मला फुले खूप आवडतात; पण गुलाब माझे आवडते फुल आहे .

गुलाबाचे फुल फारच मनमोहक असते . गुलाबाच्या पाकळ्यांची रचना खूप आकर्षक असते . निळे, पांढरे , लाल , पिवळे असे व वेगवेगळ्य़ा रंगाचे गुलाब पहायला मिळतात . गुलाबाला 'फुलांचा राजा' मानतात .

गुलाबाचे रोपटे कुठेही लावता येते . सर्व ऋतूत गुलाबाची फुले फुलतात . त्याच्या रोपट्याला काटे असतात . गुलाब फुललेले रोपटे फारच सुंदर दिसते .

गुलाबाची फुले देवाला वाहतात . समारंभात गुलाबाच्या फुलांचा वापर करतात . कोणाचेही स्वागत करताना आपण गुलाबाचे फुल देतो. गुलाबापासून गुलकंद तयार करतात. गुलाबापासून सरबतही तयार करतात .

असा हा गुलाब मला खूप आवडतो .

short but sweet

------------–----––––-
कमळ हे पाण्यात वाढणार्‍या एका वनस्पतीचे फूल आहे. दिसायला सुंदर असणारी ही जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा आहे. तिच्या सुमारे १०० जाती जगभर आढळतात. मात्र तिचे मूळस्थान भारत, चीन आणि जपान असावे. इराणपासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंत तिचा प्रसार झाला आहे.भारतात जवळपास सर्व परदेशात कमळे सापडतात.कमळ हे भारताचे व विएतनामचे राष्ट्रीय फुल आहे.कमळाची फुले उबदार असतात. म्हणून मला कमळ खूप आवडत.
साधारणपणे गोडय़ा आणि उथळ पाण्यात वाढणारी ही वनस्पती एक ते दीड मीटर उंच आणि एकाच पातळीत येन मीटरपर्यंत पसरते. खोड लांब असून पाण्याच्या तळाशी जमिनीवर सरपटत वाढते. पाने मोठी वर्तुळाकार, छत्राकृती, ६०-९० से.मी. व्यासाची असतात. पानाचे देठ लांब असतात. पानावरील शिरा पानाच्या मध्यापासून किरणाप्रमाणे पसरलेल्या असतात. कमळाची पाने आणि फुले पाण्याच्या संपर्कात न राहता पाण्यावर येऊन वाढतात. कमळाचे फूल सुगंधी आणि मोठे असते. फुलांचा रंग जातींनुसार वेगवेगळा असतो. आपल्याकडे मुख्यतः गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची कमळे आढळतात.कामालाकडे विविध कितके आकर्षित होत असतात त्यामुळे तेतील जैविविधता टिकून राहते

कमळाची पुष्पथाली (कमळकाकडी) आणि बी (कमलाक्ष) यांचा वापर अनेक भारतीय, विशेषतः सिंधी लोक खाण्यासाठी करतात


sanjay1234567890: give me on lotus
soham9905: ok
sanjay1234567890: fast
soham9905: gave
sanjay1234567890: and easy
soham9905: plz add this ans for brainliest
Answered by yourfather6
10
उमा कुलकर्णी या एक उत्तम अनुवादक आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. त्या कानडीतून मराठीत अनुवाद करतात. कानडीतल्या बहुतेक सर्व महत्वाच्या लेखकांच्या साहित्याचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. हे अनुवाद करत असताना या लेखकांशी त्यांचा जो संबंध आला त्याबद्दलचा हा लेख आहे. उमा कुलकर्णींचं ‘संवादु… अनुवादु…’  हे आत्मकथनपर पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यातलाच हा एक भाग.

 

याच सुमारास कर्नाटकातील हंपी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. एम. कलबुर्गी पुण्यात आले. ते श्री. रं. भिडेंचे कॉलेजमधले विद्यार्थी. आपण एकूणच ‘शिस्त’, ती जीवनातली असो वा संशोधनातली, भिडेंकडून घेतल्याचं ते प्रांजळपणे कबूल करत होते.

तेव्हा पुण्यात कलबुर्गींच्या ‘महाराष्ट्रातील कन्नड शिलालेख’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या निर्मितीचं काम सुरू होतं. ‘पद्मगंधा प्रकाशना’कडून ते प्रकाशित होणार होतं. अनुवादाच्या संदर्भात कलबुर्गींच्या मनात काही असमाधान होतं. त्या संदर्भात आमच्या भेटी होत होत्या.

कलबुर्गी यांचे कन्नड-प्रेम विशेष होते. पण त्याची जात केवळ अभिनिवेशाची नव्हती. इतर भाषांमध्ये जे संशोधन चाललं आहे, त्याचा कन्नड-भाषिकांना उपयोग व्हावा अशी कळकळ त्यात होती. वीरशैव आणि लिंगायत यांमधला फरक आणि त्यांचं त्यावरील संशोधन याविषयीही ते तेव्हा भरपूर बोलायचे.

त्यांच्याशी बोलताना डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या संशोधनकार्याचा उल्लेख निघाला. त्यांनीही सीमाभागातील अनेक संशोधकांकडून ढेरेंचे नाव आणि त्यांच्या संशोधनकार्याविषयी ऐकलं होतं. त्यावेळी मी ‘लज्जागौरी’ आणि ‘श्रीविठ्ठल – एक महासमन्वय’ वाचून प्रभावित झाले होते. सीमाभागातही ढेरेंचे वाचक असल्याचं आम्हालाही ठाऊक होतं. कलबुर्गी हे स्वतःही संशोधक असल्यामुळे त्यांना यात रस वाटला. या सर्व पुस्तकांचे कन्नडमध्ये अनुवाद झाले पाहिजेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांची आणि डॉ. ढेरेंची आमच्या घरी भेट ठरवण्यात आली.

पुंडे सरांमुळे आमचा एकदा ढेरेंशी परिचय झाला होता. तसंच, ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कारा’च्या वेळी आमची मुंबईत ढेरेंशी भेट झाली होती. डॉ. कलबुर्गींच्या भेटीसाठी, त्यांची कन्या, लेखिका आणि कवयित्री डॉ. अरुणा त्यांना घेऊन आमच्या घरी आली.

त्या दिवशी मी सहजच खाण्यासाठी वाटली डाळ केली होती. ढेरेंच्या अत्यंत आवडीचा तो पदार्थ असल्याचं आणि त्याच्याशी भावनिक नातं असल्याचं त्यांच्या बोलण्यातून समजलं! ढेरेंची वाटल्या डाळीची आठवण लहानपणीच मरण पावलेल्या त्यांच्या आईच्या आठवणीशी निगडित होती.

या भेटीनंतर कलबुर्गींनी पुढाकार घेऊन ढेरेंचे दहा-बारा महत्त्वाचे संशोधनग्रंथ वेगवेगळ्या अनुवादकांकडून कन्नडमध्ये अनुवादित करून घेतले आणि ते लगोलग प्रकाशित होतील, असंही पाहिलं. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या ओळखीतून विविध लिंगायत मठांकडून आवश्यक तेवढा पैसाही उभा केला. स्वतःला ‘रॅशनल’ मानणा-या कलबुर्गींचे कर्नाटकातील सर्व धनाढ्य, प्रगतिशील लिंगायत मठांशी आणि मठाधीशांशी जवळचे संबंध होते. अशा लोकोपयोगी कामांसाठी ते मठाधीशांचं मन वळवून या मठांकडून हक्काने आर्थिक मदत घ्यायचे.

बघता बघता रा. चिं. ढेरे कर्नाटकातील संशोधनक्षेत्रात मान्यता पावले. त्यांचा काही मठांकडून आणि संस्थांकडून त्यांच्या संशोधनानिमित्त सत्कारही झाला.

विशेष म्हणजे कलबुर्गींचे ढेरेंशी संशोधनाच्या संदर्भात काही बाबतींत मतभेद होते. पण “कुठलंही संशोधन हा पूर्णविराम नसतो, तो स्वल्पविराम असतो..” असं त्यांचं म्हणणं होतं. हे मानणा-या कलबुर्गींना ढेरेंचं सारं संशोधन कन्नड भाषेत येणं हे आपलं कर्तव्य वाटलं.

या वेळच्या गप्पांमध्ये एकदा कलबुर्गी म्हणाले, “माणूस जेव्हा शिकार करायचा तेव्हा त्याने खंडोबा हा देव केला. खंडोबाचा घोडा आणि कुत्रा हे त्याच्यासाठीही उपयुक्त प्राणी होते. जेव्हा तो शेती करू लागला तेव्हा त्याने शंकराला देव केला. नंदी म्हणजे बैल हा त्याच्यासाठी उपयुक्त प्राणी होता. जेव्हा माणसांचे समूह बनू लागले, समूहप्रमुख राजे निर्माण झाले, तेव्हा विष्णू हा त्यांचा देव पुढे आला. राजाचा सगळा थाट, राजवाडा, दागदागिने, मिष्टान्नाचा नैवैद्य हे सगळं त्या देवासाठीही सुरू झालं. आज समाज लोकशाही आणि विज्ञानाच्या मार्गाने पुढे चालला आहे. आजचा समाज आपला देव विज्ञानातून निर्माण करणार आहे की लोकशाहीतून, हे पुढच्या काळात पाहिलं पाहिजे!”

त्यांच्या मुलाची पुण्याहून बदली झाली आणि त्यांचं पुण्याला येणं कमी झालं. ते धारवाडला गेल्यावरही आमच्या त्यांच्याशी फोनद्वारे आणि धारवाडवरून जाताना संपर्क राहिला. अमेरिकन संशोधक डॉ. डी. एन. लॉरेन्जेन यांनी लिहिलेला एक इंग्रजी संशोधनग्रंथ त्यांना कन्नडमध्ये अनुवादित करून हवा होता. डॉ. लॉरेन्जेन यांनी आपल्या प्रबंधासाठी भारतातील ‘काळामुख’ आणि ‘कापालीक’ या दोन शैव संप्रदायांची निवड केली होती. हा एक महत्त्वाचा संशोधनग्रंथ आहे, असं डॉ. ढेरे यांनीही म्हटलं होतं. कलबुर्गींनी अनेक अनुवादकांकडे ती जबाबदारी सोपवूनही काम झालं नव्हतं.


Similar questions