Psychology, asked by shifa323232, 3 months ago

माझा आवडता खेळ बॅडमिंटन निबंध​

Answers

Answered by Itzkrushika156
169

Explanation:

आमच्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे खेळ हे खेळले जातात. जसे कि क्रिकेट, हॉकी, टेनिस इत्यादि। अनेक खेळ प्रामुख्याने खेळले जातात. त्या सर्व खेळांपैकी बॅडमिंटन हा एक प्रमुख खेळ आहे.

हा खेळ भारत देशामध्ये पूर्वीच्या काळापासून खेळला जात आहे. हा खेळ खेळण्यासाठी अधिक जागेची गरज भासत नाही. कारण बॅडमिंटन हा खेळ गावात किंवा शहरात कुठेही खेळला जाऊ शकतो.

बॅडमिंटन खेळाची सुरुवात

बॅडमिंटन या खेळाची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात झाली. बॅडमिंटन या खेळाचा शोध बिटिश अधिकाऱ्यांनी लावला होता. पुण्यातील ब्रिटिश छावणीत हा खेळ काही कालावधीतच लोकप्रिय झाला. म्हणून या खेळ ‘पुनाई’ असे सुद्धा म्हटले जाते.

बॅडमिंटन खेळाची रचना

सर्वात प्रथम बॅडमिंटन या खेळाचे लोकरीचे गोळे वापरले जात होते. काही कालावधी नंतर शटलकॉकचा शोध लागला. हा खेळ खेळण्यासाठी दोन रॅकेट आणि शटलकॉकचा आवश्यकता असते.

तसेच हा खेळ खेळण्यासाठी जास्त नियम नसतात. म्हणून कोणतीही व्यक्ती हा खेळ खेळू शकते. या शटलकॉकला पक्षी म्हणून सुद्धा ओळखले जाते. कारण या शटलकॉकला पक्ष्यासारखे छोटे पंख असतात.

बॅडमिंटन खेळाचे मैदान

बॅडमिंटन खेळाच्या मैदानाला कोर्ट असे म्हटले जाते. हे कोर्ट आयताकृती असते आणि हे मैदान दोन समान भागात भाग केले जाते.

हा खेळ एका जोडीमध्ये किंवा दोन जोडींमध्ये खेळला जातो. सिंगल कोट हा डबल कोर्टपेक्षा रुंदीने थोडा लहान असतो. परंतु दोघांची लांबी ही समान असते.

डबल्स कोर्टची रुंदी ६.१ मीटर म्हणजे २० फूट असते आणि सिंग्लस कोर्टची रुंदी ५. १८ म्हणजे १७ फूट असते. या दोन्ही कोर्टची लांबी १३.४ म्हणजेच ४४ फूट एवढी असते.

बॅडमिंटन खेळाचे नियम

जेव्हा खेळाडू हा खेळ खेळतो तेव्हा शटलकॉक हे प्रतिस्पर्धेच्या शॉर्ट सर्विस लाईनच्या पुढे गेले पाहिजे. नाहीतर त्याला फाऊल मानले जाते. सुरुवातीला दोन्ही खेळाडू हे समोरासमोर उभे न राहता तिरपे राहतात.

हा खेळ टेनिस सारखाच असतो परंतु याचे नियम वेगळे आहेत. बॅडमिंटन हा खेळ खेळताना शटलकॉक वरून न मारता कमरेच्या खालच्या अंतरावरून मारतात. सर्विस करताना रॅकेट अधोमुखी असले पाहिजे. त्याच बरोबर रॅकेटचा गोल भाग हा खाली असता पाहिजे. हा खेळ खेळताना शटलकॉक हे खाली पडत कामा नये.

या खेळामध्ये सिंग्लस कोर्ट मध्ये जर खेळाडूचे गुण सम असतील तर सर्विस कोर्टच्या उजव्या बाजूला उभा राहतो आणि विषम असल्यास कोर्टच्या डाव्या बाजूला उभा राहतो.

बॅडमिंटन खेळाचे फायदे

1) बॅडमिंटन हा खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते.

2) तसेच संपूर्ण शरीराचा विकास होतो.

3) बॅडमिंटन हा खेळ खेळल्याने आपली विचार करण्याची गती वाढते.

4) हा खेळ खेळून आपण लठ्ठपणावर विजय मिळवू शकतो.

5) बॅडमिंटन हा खेळ खेळण्याने शरीरात रक्ताचा प्रवास सुरळीतपणे होतो.

6) तसेच या खेळामुळे हृदयविकार होत नाहीत.

7) बॅडमिंटन हा खेळ खेळण्याने हाताचे आणि पायाचे स्नायू मजबूत होतात.

8) तसेच हा खेळ खेळणाऱ्या व्यक्तीला कोणतेही काम करणाऱ्या जास्त वेळ लागत नाही.

9) बॅडमिंटन हा खेळ खेळल्याने आपले मन शांत राहते आणि आपण आनंदित राहतो.

FOLLOW KR MALA

Answered by Prempundir389
12

Explanation:

this is your ans

I hope it helps to you.

Attachments:
Similar questions