माझा आवडता खेळाडू speech in marathi
Answers
■■' माझा आवडता खेळाडू' या विषयावर भाषण■■
या वकतृत्व स्पर्धेत उपस्थित असलेले मुख्याध्यापक, सगळ्या शिक्षकांचे आणि माझ्या मित्रांचे मी मनापासून स्वागत करते. आज मी 'माझा आवडता खेळाडू' या विषयावर बोलू इच्छितो.
महेंद्र सिंह धोनी हा माझा आवडता खेळाडू आहे.तो एक जगप्रसिद्ध क्रिकेटपटू आहे.मला त्याचा शांत व नम्र स्वभाव,खेळण्याची पद्धत फार आवडते.
धोनीचे जन्म ७ जुलै,१९८१ रोजी रांची येथे झाले होते.त्याच्या शालेय दिवसांमध्ये तो फुटबॉल संघाचा यष्टिरक्षक होता.नंतर त्याच्या प्रशिक्षकाने त्याला क्रिकेट संघासाठी निवडले.
त्याने त्याच्या क्रिकेट करियर दरम्यान अनेक रिकॉर्ड बनवले आहेत.त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने अनेक सामने जिंकले आहेत.त्याच्या उत्तम कारकीर्दीमुळे त्याला पद्मभूषण,पद्मश्री व राजीव गांधी खेळ पुरस्कार मिळाले आहेत.
इतकं यश मिळून सुद्धा तो प्रत्येक सामन्यासाठी तितकीच मेहनत आणि समर्पण दाखवतो आणि म्हणूनच तो माझा आवडता खेळाडू आहे.
धन्यवाद!!