India Languages, asked by TransitionState, 1 year ago

माझा आवडता खेळ- कबड्डी मराठी निबंध, भाषण, लेख

Answers

Answered by halamadrid
37

Answer:

कबड्डी हा माझा आवडता खेळ आहे.आम्ही मित्र-मैत्रिणी हा खेळ खेळतो.सगळ्यांना हा खेळ आवडतो.

कबड्डी हा खेळ मैदानात खेळतात.या खेळासाठी पैसे लागत नाही.कोणत्याही वस्तू आणाव्या लागत नाही.सर्व मुले हा खेळ खेळू शकतात.

कबड्डी या खेळात दोन संघ असतात.प्रत्येक संघात सात खेळाडू असतात.मैदानाचे दोन समान भाग केले जातात, मध्ये एक रेखा आखली जाते.हा खेळ २०-२० मिनिटांच्या दोन भागांत खेळला जातो. प्रत्येक संघातील एक खेळाडू मध्य रेखा ओलांडून इतर संघाच्या सदस्यांना स्पर्श करून त्यांना खेळातून बाद करून परत धावत येतो. जितके अधिक विरोधी खेळाडूंना स्पर्श केले जाते, तेवढे अधिक गुण मिळतात परंतु विरोधक संघ शारीरिकदृष्ट्या त्याला दुसऱ्या बाजूला जाण्यापासून रोखू शकतो,त्यावेळी खेळाडूला एकही गुण मिळत नाही.

या खेळामुळे आपण चपळ बनतो.आपल्याला खूप व्यायाम मिळतो.मित्रांबरोबर खेळण्याचा आनंद मिळतो.या सगळ्या गोष्टींमुळे मला कबड्डी हा खेळ आवडतो.

Explanation:

Answered by jitendrakumarsha2432
3

Answer:

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध बघणार आहोत. कबड्डी बद्दल माहिती घेऊया आणि सुरुवात करूया निबंधाला.

माझा आवडता खेळ कबड्डी जगात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात, निरनिराळ्या खेळांच्या स्पर्धा भरवल्या जातात. क्रिकेट व फुटबॉल, टेनिस यांसारखे खेळांच्या स्पर्धा जगभरातील लोक आवडीने पहातात. क्रिकेट, हॉकी फुटबॉल कितीही लोकप्रिय खेळ असले तरी माझा प्रिय खेळ कबड्डी आहे. हा खेळ आजही गावांत, गल्लीत, शहरातील शाळेत खेळला जातो. प्रत्येक खेळाप्रमाणे कबड्डीत मनोरंजनाबरोबरच व्यायाम पण होतो. अन्य खेळांप्रमाणे याला भारी खेळाच्या सामानाची गरज नसते.

Similar questions