India Languages, asked by AditiDhuri, 4 months ago

माझा आवडता खेळ निबंध in marathi​

Answers

Answered by XxitsmrseenuxX
60

Explanation:

मित्रांनो आजच्या काळात क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ सर्वात आधी इंग्रजांनी भारतात आणला होता व तेव्हापासूनच भारतीयांमध्ये या खेळाविषयीची गोडी वाढतच आहे. आजच्या या लेखात आपण क्रिकेट विषयीची मराठी माहिती पाहणार आहोत या महितील आपण माझा आवडता खेळ क्रिकेट म्हणूनही वापरू शकतात.  

खेळ कोणताही असो त्यात मनोरंजना सोबत शरीराचा व्यायाम पण होऊन जातो. खेळामुळे शरीर मजबूत बनते. आपल्या देशात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळले जातात. जसे हॉकी, टेबल टेनिस, फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बुद्धिबळ इत्यादी. क्रिकेट हा भारतात सर्वात लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ सर्व प्रथम इंग्रजांद्वारे भारतात आला होता. आणि तेव्हा पासून तर आज पर्यंत या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

क्रिकेटचे सामने दोन तऱ्हेचे असतात. एक दिवसीय सामना व पाच दिवसीय सामना. एक दिवसीय सामन्यात दोघी टीम ठरलेल्या ओव्हर खेळतात आणि मॅच चा निर्णय पण त्याच दिवशी कळून जातो. पाच दिवसीय मॅच लांब चालते. यात ओव्हर ची संख्या अनिश्चित असते आणि खेळाडू रोज पाच दिवसापर्यंत खेळतात. क्रिकेट चे सामने दोन संघामध्ये होतात. दोन्ही संघामध्ये 11–11 खेळाडू असतात. क्रिकेट मध्ये दोन अंपायर असतात, अंपायर निर्णय देण्याचे काम करतात. क्रिकेट खेळण्यासाठी मैदान साफ असायला हवे. क्रिकेट भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड इत्यादी देशात लोकप्रिय आहे. हा खेळ गरीब, श्रीमंत, नेता, अभिनेता, विद्यार्थी, कर्मचारी सर्वानाच आवडतो.

क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू आणि बॅट आवश्यक असतात. क्रिकेटची मॅच दोघी टीम मध्ये टॉस ने सुरू होते. मॅच च्या ओव्हर ठरलेल्या असतात. प्रत्येक ओव्हर मध्ये 6 बॉल असतात. बॉल टाकण्याचे पण नियम असतात. जर बॉल व्हाईट किंवा बाउन्सर गेला तर त्या बॉल ला नो बॉल घोषित करून, बॅटिंग करणाऱ्या टीम का अतिरिक्त रन दिले जातात.

भारतीय क्रिकेट संघात खूप चांगले चांगले खेळाडू खेळले आहेत. पण आजही सचिन तेंडुलकर ला क्रिकेट चे भगवान म्हणून ओळखले जाते. क्रिकेट प्रेमी साठी सचिन तेंडुलकर हे आवडते खेळाडू आहेत. इत्यादी अनेक कारणांमुळे मला सुद्धा क्रिकेट हा खेळ खूपच आवडतो.

HOPE THIS WILL HELP YOU

PLZ.. MARK ME AS BRAINLIEST

Similar questions