India Languages, asked by gunjanpatil608, 1 year ago

माझा आवडता मित्र मराठी निबंध

Answers

Answered by rutujabhosle69
9

तुझे उत्तर पुढील प्रमाणे!!!!!

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये मैत्री ही खूप महत्वाची असते. मैत्री म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल असणारा आदर, प्रेम आणि आपुलकी. एक मित्रांशिवाय आपले जीवन हे अधुरे आहे.एक चांगला हा आपल्या सुख – दुःखात आपल्याला साथ देतो. जेव्हा आपण एखाद्या अडचणीत असतो तेव्हा तो आपल्या पाठीशी खंभीरपणे उभा राहतो. तसेच तो आपल्या समस्या दूर करतो आणि सांत्वन देतो.मैत्रीण जेव्हा आपल्यावर रुसते आणि अक्षरशः आपल्याशी बोलणंच बंद करून टाकते... तेव्हा मनाला काय वेदना होत असतील हे मैत्री जाणणाऱ्या तिच्या म्हणजेच रुसलेल्या मुलीच्या खऱ्या मित्रालाच कळेल...एका रुसलेल्या मैत्रिणीला मनवण्यासाठी काही ओळी सुचल्या त्याच इथे लिहिल्या.. तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी एखादी मस्करी केल्यानंतर ती रुसली असेल तर तिला मनवण्यासाठी तुम्ही माझी कविता वापरू शकता... फक्त माझा ब्लॉग प्रामाणिकपणे तुमच्या फेसबुकआणि व्हाटसअॅपवर शेअर करा...आणि एक महत्वाचा प्रश्न स्वतःला विचारा- ती तुमची नक्की मैत्रीणच आहे ना? कि अजून काही?.....माझी कविता खूपच लहान पण अर्थपूर्ण आणि परिणामकारक आहे... ती आता पुन्हा बोलायला लागली..तिच्याशी छोटीशी मस्करी केली,अन् तिने माझ्याशी मैत्रीच् तोडली,माझीच सवय मलाच नडली,मला चांगलीच अद्दल घडली अशी ती अप्रिय घटना घडली,तेव्हा मला अक्कल आली,तिने मैत्री तोडून माझीच थट्टा केली,Dear,नाही करणार पुन्हा अशी चुकी,मनापासून माफी मागते तुझी,पण मला पुन्हा हवी मैत्री तुझी...

hope it will be helpful for you!!!!!!

plz follow me and Mark as a brainlist!

Answered by ItsShree44
4

Answer:

समीर हा माझा एक जिवलग मित्र आहे. तो नेहमी खेळांच्याच गप्पा मारत असतो. तो खरा खेळगडी आहे. समीरला कुठल्याही एका विशिष्ट खेळाची आवड आहे, असे नाही आहे. नाहीतर सदासर्वकाळ क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या मैदानाची लांबीरुंदी माहीत असते बरे? ई! सर्वच खेळांत तो रस घेतो. विशेष म्हणजे प्रत्येक खेळाविषयी त्याला तंत्रशुद्ध माहिती समीर खेळांविषयीची केवळ माहिती गोळा करत नाही, तर तो सर्व खेळ उत्तम खेळतो. सहज एखादा निरोप सांगायला म्हणून तो घरी येतो, आणि कॅरमचा एक डाव जिंकून जातो. तितक्याच सफाईने तो शाळेच्या क्रिकेट संघात आपली कामगिरी बजावतो. रात्रीच्या वेळी रस्त्यावर आट्यापाट्या खेळणाऱ्या कामगारांतही त्याला भाव आहे. 'समीरदादा' आले की आपला संघ जिंकणार, अशी त्यांना खात्री असते.

कोणत्याही खेळाच्या जागतिक स्पर्धा सुरू झाल्या की, त्याची सर्व माहिती, अगदी आकडेवारीसह समीरला तोंडपाठ ! किती राष्ट्रे या स्पर्धेत उतरली आहेत? सामने कोठे कोठे आहेत? प्रत्येक संघातील उत्तम खेळाडू कोण? त्या खेळाडूंच्या खेळाचे वैशिष्ट्य काय? यांबाबतची सगळी माहिती समीर देत असतो. त्याने बांधलेले अंतिम निकालाबद्दलचे आडाखे सहसा चुकत नाहीत; कारण याबाबतचा समीरचा अभ्यास चोख आहे. खेळांविषयीच्या पुस्तकांचा मोठा संग्रह त्याच्याजवळ आहे. प्रत्येक वृत्तपत्रात येणाऱ्या क्रीडाविषयक बातम्या तो बारकाईने वाचतो. आवश्यक ती कात्रणे काढून ठेवतो. त्याने जमवलेला खेळाडूंचा आल्बम तर पाहण्यासारखा आहे. कुठेही कोणी खेळाडू येणार आहे, असे कळले की समीर धावलाच तेथे त्याला भेटायला.

समीरच्या या छंदाला त्याचे आईवडील केव्हाही विरोध करत नाहीत. उलट दोघेही त्याचे कौतुक करतात. त्याचे बाबा क्रीडाविषयक मासिके त्याला आणून देतात. कारण समीर छंद सांभाळून आपला अभ्यासही उत्तम ठेवतो. त्यामुळे माझा हा दोस्त घरात, शाळेत आणि सर्व मित्रांत विशेष आवडता आहे.

Similar questions