माझा आवडता मित्र निंबध फकत मराठी तच
Answers
ये दोस्ती हम नाही छोडेगे| तोडेगे दम मगर तेरा साथ ना छोडेगे |” पूर्वीच्या सिनेमामध्ये दोस्तीवर खूप गाणे असायचे आणि गोष्टी पण दोस्तीवर आधारलेल्या असायच्या. त्यामुळे आम्हाला पण वाटायचे की आपली पण अशीच दोस्ती व्हावी कोणाबरोबर तरी.
तसे माझे खूप मित्र आहेत पण आम्ही लहानपणापासून एकत्रच होतो. त्यामुळे एक ग्रुप असा तयार झाला आहे. आम्ही सगळे एकटे किंवा एखादा भाऊ किंवा बहीण असलेले आहोत. आमची कॉलनी मध्ये सगळी न्यूक्लियर कुटुंबे आहेत. त्यामुळे आम्हाला एकत्र कुटुंबातील काहीच मजा माहीत नाही. आम्ही काहीतरी सनसनाटी घडावे अशी वाट बघत होतो. तेव्हड्यात त्याचे आमच्या शाळेत पदार्पण झाले. आम्हाला खुपच आनंद झाला .चला! आता ह्याची फिरकी घ्यायची. पण त्यानेच आमची तोंडे उघडीच राहतील असे पदार्पण केले.
मला अजून आठवतो आहे त्याचा आमच्या शाळेतील पहिला दिवस!कडक गणवेष, व्यवस्थित भांग पाडलेले केस नीट नेटके व्यवस्त्थित दफ्तर, पॉलिश केलेले बूट आणि ताठ बांधा. आम्ही सगळे जण त्याच्याकडे बघतच बसलो. शिक्षकांनी ओळख करून दिली, “हा अजिंक्य जोशी. आजपासून तो आपल्या शाळेत शिकणार आहे. हा कर्नल अमेय जोशींचा मुलगा आहे” आम्ही सगळेजण खूप खुश झालो.कारण अमेय जोशी आमच्या गावाचे भूषण आहेत. त्यांचा मुलगा आमच्या शाळेत खेळात पुढे जायचे म्हणून आला. शिक्षकांनी त्याला माझ्या जवळच बसायला सांगितले. आमची ओळख झाली आणि त्या दिवसापासून आम्ही दोघे जिवलग मित्र झालो.
आमच्यात काहीही कॉमन नाही. तरीही आम्ही जोडगोळी म्हणून ओळखले जाऊ लागलो. कदाचित विरुध्द्ध चुंबक एकमेकांना आकर्षित करतात हाच नियम इथेही लागू झाला असेल. तो उंच ,मी साधारण उंचीचा. तो सडपातळ मी गुटगुटीत. तो गोरा ,मी निमगोरा. तो व्यवस्थित ,मी गबाळा. आमचे एकमेकांशी तरीही छान पटते. कारण तो सांगतो आणि मी ऐकतो. त्याच्याकडून खूप शिकता येते. कारण तो खूप हुशार आहे. तो यायच्या आधी माझा पहिला नंबर होता. आता त्याचा आणि माझा विभागून पहिला नंबर येतो. तथापि त्याचे आणि माझे आवडते विषय वेगवेगळे आहेत. तो गणितात आणि इतिहास भूगोल तसेच संस्कृत मध्ये पैकी च्या पैकी गुण मिळवतो, आणि मला सायन्स आणि भाषांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळतात. त्यामुळे आम्ही एकमेकांना न येणारे विषय शिकवतो.
भविष्याची स्वप्ने :
आम्ही पुढे कोण होणार हयाबद्दल खूप चर्चा करतो आणि स्वप्न रंगवतो. त्याला त्याच्या वडिलांसारखेच आर्मीत जायचे आहे. म्हणून तो स्पर्धात्मक परीक्षांसाठी आतापासूनच तयारी करीत आहे. माझेपण आयएएस बनण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे मी पण त्याच्या बरोबर स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करीत आहे. त्यामुळे आम्हाला एकमेकांचे कच्चे असलेले विषय सुधारायला मदत होते. आम्ही एकमेकांकडे जाऊन अभ्यास करतो.
त्याच्याकडे त्याचे आई, बाबा आणि तो इतकीच माणसे आहेत. पण बाबा कर्नल असल्याने नोकर चाकर खूप आहेत. त्यांचे घर खूप मोठे आहे. आणि सरकारी इमारत असल्याने पूर्वीच्या ब्रिटिश अधिकार्यांचा बंगला असतो तसे आहे. मी पहिल्यांदा गेलो तर माझी छातीच दडपून गेली. आम्ही जारी फ्लॅटमध्ये राहत असलो तरी इतके मोठे घर पहिले नव्हते. पण त्याच्या बाबांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी एकदम प्रेमाने मला बोलविले आणि जवळ बसवून सगळी चौकशी केली. त्यांच्या दोघांच्या बोलण्यावरून मला जाणवले की ते किती सुसंस्कृत आहेत. म्हणूनच अजिंक्य इतका सुसंस्कृत वागतो. तरीही मी पाहीले, त्यांच्या घरात कडक शिस्त पण आहे. अगदी मिलिटरी खाक्या.
म्हणूनच अजिंक्य इतका वक्तशीर, व्यवस्थित आणि हुशार आहे. त्याच्याबरोबर राहून मी पण नकळत नीटनेटका आणि वक्तशीर व्हायला लागलो. आई तर चाटच पडली .माझ्यामध्ये असा बदल कसा झाला. मी तिला अजिंक्य बद्दल सांगितले. तर ती म्हणाली ,“ बघ,खरे मित्रा असे असतात जे तुमच्यामध्ये चांगला बदल घडवून आणतात. त्यासाठी त्यांना कडू बोलावे लागले तरी ते विचार करीत नाही. नाहीतर गोड बोलणारे भरपूर असतात ज्यांना तुझ्याकडून काहीतरी फायदा असतो अजिंक्य तुझा खरा मित्र आहे. त्याला सोडू नकोस” “ मी कुठे त्याला सोडणार आहे. उलट तोच चालला आहे NDA ला कमिशन ऑफिसर बनण्यासाठी “ मी म्हणालो. आईला त्याचे आणखी कौतुक वाटले. अश्याच एका प्रसंगाने आमच्या घरात तो सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनला.
प्रसंगवधानी मित्र :
एकदा आम्ही रात्री परीक्षेचा अभ्यास करीत होतो तेंव्हा आईच्या अचानक पोटात दुखायला लागले. जवळ डॉक्टर नव्हते. बाबा पण घरी नव्हते. ती तळमळत होती. अजिंक्यने ताबडतोब त्यांच्या डॉक्टरना फोन केला आणि त्यांना गाडी घेऊन बोलविले. त्याने आणि मी आईला उचलले आणि दवाखान्यात नेले. त्याची पण आई आली, त्यामुळे मला धीर आला. आणि आईला बरे वाटले. मी विचारले “ तुला एव्हडे पटकन कसे सुचले” तर तो म्हणाला “ अरे,मिलिटरीत जायचे म्हणजे हीच तर परीक्षा असते. म्हणूनच आपले जवान सगळ
असं म्हणतात की जो वेळेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र .कोणाशीही मैत्री करणे खूप सोपे आहे, परंतु चांगले मित्र असणे कठीण आहे. माझे बरेच मित्र आहेत परंतु मला राहुल सर्वात जास्त आवडतो.
राहुल माझा सर्वात चांगला मित्र आहे. तो माझ्या वर्गात आहे. तो पंधरा वर्षांचा आहे. तो माझ्या शेजारी राहतो, म्हणून आम्ही एकत्र खेळतो. तो मला खूप आवडतो. राहुल अतिशय सुंदर मुलगा आहे. त्याचे आरोग्य चांगले आहे. तो मधुर बोलतो. त्याच्याकडे चांगला शिष्टाचार आहे. तो अभ्यास आणि क्रीडा दोन्हीत पारंगत आहे. त्याने क्रीडा स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे जिंकली आहेत. जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा तो उपयुक्त ठरला.त्यांचे वडील डॉक्टर आहेत आणि त्यांची आई शिक्षक आहेत. दोघेही खूप दयाळू आणि सौम्य आहेत. त्याची आई मला तिच्या स्वतःच्या मुलासारखी वागवते. मला राहुल खूप आवडतो कारण तो बुद्धिमान व चांगला खेळाडू आहे. त्याच्याकडे कोणतीही वाईट सवयी नाही. तो त्याच्या पालकांचा , शिक्षकांचा आणि इतरांचाही आदर करतो. तो वेळेत शाळेत जातो आणि नियमितपणे घरगुती काम करतो. त्याच्या या वागणुकीमुळे तो शिक्षकांचाही आवडता विद्यार्थी आहे.
राहुलला गरीबांबद्दल खूप सहानभूती आहे आणि तो त्यांना मदत करतो. त्याला त्यांच्यासोबत देखील वेळ घालवायचा आहे.