India Languages, asked by Nitin3427, 1 year ago

माझा आवडता प्राणी कुत्रा, मांजर, सिंह, गाय, घोडा इत्यादी –...

Answers

Answered by halamadrid
8

Answer:

मांजर हे माझे आवडते प्राणी आहे.आमच्या घरी आम्ही एक मांजर पाळली आहे.तिला आम्ही 'मनी' म्हणतो.तिचा रंग काला-पांढरा आहे.अंधारातही तिचे डोळे मण्यांसारखे चमकतात.तिचे अंग मऊ आणि गुबगुबीत आहे.

आमच्या मनीला दूध,दूधात भिजवलेली पोळी, मासे खायला फार आवडतात.ती फार चपळ आहे.ती पटापट उड्या मारत धावते. ती उंदराला पटकन पकडते.तिला उंदीर खूप घाबरतात. त्यामुळे आमच्या घरात उंदीर येत नाहीत.

मी बाहेरून आले की,ती धावत माझ्या जवळ येते.मी तिच्या अंगावरून हात फिरवते.ते तिला फार आवडते.ती नेहमी माझ्या जवळपास वावरते.मला आमची मनी फार आवडते.

Explanation:

Similar questions