India Languages, asked by sushilchourasia872, 9 hours ago

माझा आवडता प्राणी निबंध
please tell me guys.​

Answers

Answered by AvikaShetty
0

Answer:

कुत्रा हा एक अत्यंत प्रेमळ प्राणी आहे. कुत्र्या इतका इमानदार कुठलाच प्राणी नाही. कुत्रा नेहमी आपल्या मालकाची रक्षा करतो तसेच कोणी अनओळखी माणूस आपल्या घरा जवल आला तर तो लगेच भुंकून इशारा देतो. म्हणूनच लोक आपल्या घरात कुत्रा पळतात.

मला पण कुत्रे फार आवडतात माल कुत्र्यांन विषयी फारशी माहिती आहे, आणि मी सुद्धा एक कुत्रा पळला आहे. माझ्या कुत्र्याचे नाव "प्रीन्स" आहे, तो जर्मन शेपर्ड ह्या जातीचा कुत्रा आहे. प्रिन्स दिसायला खूप सुंदर दिसतो पण तो तितकाच घातक पण आहे. सोमोर प्रिन्स दिसला कि कोणीही अनओळखी माणूस त्याच्या समोर येण्याची हिंमत करत नाही, त्याला बघून सर्वे घाबरतात.

Answered by manaspatil1403
0

Answer:

वाघ

Explanation:

वाघ माझा आवडता प्राणी आहे पण मला वाघाच्या जवळ जायची संधी मिळाली तर मी कधीच जाणार नाही. वाघा जवळ गेलो तर वाघ खाऊन टाकेल.

      वाघ फार सुंदर दिसतो. वाघाचा रंग पिवळा असतो. त्याच्या अंगावर काळया रंगाचे पट्टे असतात. वाघ  अत्यंत रुबाबदार दिसतो. वाघ खूप ताकदवान प्राणी आहे. वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आहे.

        सिंहाला जरी जंगलाचा राजा म्हणत असले तरी मला वाघच जंगलाचा राजा वाटतो. वाघ  सिंहापेक्षा आकाराने मोठा असतो. वाघाची ताकद  सिंहापेक्षा जास्त असते.

       वाघ समूह करून राहत नाही. तो एकटा शिकार करतो. सिंह फक्त भूक लागल्यावरच शिकार करतो. वाघ मात्र त्याला पाहिजे तेव्हा शिकार करतो. वाघ झाडावर चढण्यामध्ये पटाईत असतो.

          जंगलामध्ये वाघाचा फार दरारा असतो. वाघाच्या एका डरकाळीने सगळे जंगल हादरून जाते. वाघ जिथे जाईल तिथे त्याच्या भीतीने शांतता पसरलेली असते.

         वाघ त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करतो. वाघ कुणालाच घाबरत नाही, पण मी वाघाला घाबरतो तरीपण  मला वाघ जास्त आवडतो.

     वाघाचा वेग आणि त्याची ताकद अमर्याद असते. माझ्या नजरेत वाघच जंगलाचा अनभिषिक्त सम्राट आहे.

                 आशा आहे की हे आपल्यासाठी उपयुक्त ठरेल

Similar questions