माझा आवडता पक्षी पोपट आहे निबंध लिहा
Answers
Answer:
आपण आपल्या आजूबाजूला वेगवेगळे पक्षी पाहत असतो. आपल्या सर्वांनाच पक्षी खूप आवडतात. पक्षी हे निसर्गाची शोभा वाढवत असतात.
निसर्गातील छान छान पक्ष्यांपैकी पोपट हा माझा आवडता पक्षी आहे. लहानपणापासून मला पोपट पक्षी खुप आवडतो.आकाशात उडणारा पोपटांचा थवा पहिला तरी खूप छान वाटते.पोपट हा दिसायला अतिशय सुंदर पक्षी आहे. पोपटाला आपण अगदी सहजपणे ओळखू शकतो.
पोपटाच्या शरीराची रचना ही मध्यम आकाराचा असते. पोपटाची चोच टोकदार व बाकदार असते. पोपटाची चोच लाल रंगाची असते . काही पोपटांची शेपटी लांब तर काहींची आखूड असते. पोपटाची मान ही आखूड व पंख मजबूत असतात.पोपट हा रंगबेरंगी असल्याने तो सर्वांना आवडतो. पोपट हा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या रंगात आपल्याला पाहायला मिळतो.
पोपटाचा सामान्य रंग हा हिरवा असतो. आपल्या भारत देशामध्ये आढळून येणारे पोपट हे बहुदा हिरव्या रंगाचे असतात. पोपटाच्या पायाला चार नखे असतात.बाकीच्या देशांमध्ये पोपट हे निळ्या, पिवळ्या, लाल रंगांमध्येही पाहायला मिळतात.
Explanation:
Hope it's help you