माझे आवडते पर्यटनस्थळ या विषयावर दहा ओळींची निबंध लिहा.
Answers
Answer:
see jfkskgkdkvkskvkdkvkskvod
Answer:
Home कथनात्मक मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध | Tourist Destination essay in marathi
मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध | Tourist Destination essay in marathi
By ADMIN
रविवार, ५ एप्रिल, २०२०
मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध | Tourist Destination essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये आंबोली या पर्यटन स्थळा विषयी माहीती देण्यात आली आहे.उन्हाळ्याच्या सुट्टीत घालवलेले ते सोनेरी क्षण या निबंधात दर्शविले आहेत ते तुम्हाला लक्षात येईलच . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
माझे एक काका सावंतवाडीला राहतात. एकदा मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही काकांकडे गेलो होतो. आम्ही सर्वचजण आल्यामुळे काका आनंदात होते. मोठ्या उत्साहात त्यांनी आम्हांला संपूर्ण सावंतवाडीचे दर्शन घडवले. एके दिवशी त्यांनी आंबोलीला जाण्याचा बेत जाहीर केला आणि आम्हा मुलांमध्ये उत्साहाची लाटच पसरली. वास्तविक मी पूर्वी आंबोली पाहिले आहे. परंतु हे डोंगरमाथ्यावरील सुंदर गाव पुन्हा पाहायला मिळणार, याचा मलाही खूप आनंद झाला होताच.
Tourist Destination essay in marathi
आंबोली हे निसर्गाची कृपा लाभलेले डोंगरमाथ्यावरचे एक छोटेसे गाव आहे. प्रथम आम्ही सावंतवाडीहून गाडीने आंबोलीकडे निघालो, तेव्हा त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या 'दानोली' या गावी पोहोचलो. मग रमतगमत डोंगरमाथ्यावरील आंबोली या गावी पोहोचलो. या आंबोलीला अलीकडे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धी मिळू लागल त्याला 'गरिबांचे महाबळेश्वर' म्हणून ओळखतात,
'आंबोली ' या ठिकाणाचा समावेश कोकणातील सिंधदुर्गात केला जातो, अजूनही या ठिकाणाचे शहरीकरण झाले नाही, म्हणून ते घाटमाथ्यावरील एक टुमदार खेडेगावच आह. या घाटमाथ्यावरून सुंदर दृश्ये दिसणारी ठिकाणे आहेत, ते पॉइन्टस म्हणूनच ओळखले जातात. तेथील सूर्यास्त पाहण्यासाठी प्रवासी आवर्जून येतात. या आंबोली गावात अजून दोन प्रेक्षणीय स्थानांचा उल्लेख केला जातो. ती स्थाने म्हणजे 'महादेवगड' आणि 'नारायणगड'. गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थानांवर गडांच्या कोणत्याही खुणा आज आढळत नाहीत. या गडांच्या आश्रयाने तेथील काही भूमिपुत्रांची वस्ती आहे. अगदी थोड्या पैशात ते भाकरी, पिठले, कढी देऊन आपले स्वागतही छान करतात.
आंबोली घाटाला कोणत्याही काळात पर्यटक भेट देतात, पण खासकरून वर्षा ऋतूत येथील सौंदर्य अनुपम असते. निसर्गराजा प्रसन्न होऊन आपले जलवैभव येथे ओतत असतो आणि शहरातून थकून आलेले पर्यटक या पाण्यात न्हाऊन आपल्या थकव्याला पळवून लावतात. आंबोली-बेळगाव रस्त्यावर थोडी पायपीट केल्यावर हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान दिसते. येथे पार्वतीदेवीचे मंदिर आहे. ही हिरण्यकेशी नदी म्हणजे भगवान महादेवाने पार्वतीला दिलेली भेट अशी कथा सांगितली जाते. पुढे या नदीला चित्री नावाची नदी मिळते आणि मग या मैत्रिणी हातात हात घालून कर्नाटकाकडे मार्गस्थ होतात. या हिरण्यकेशी नदीवर असलेला नागरतास धबधबा आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतो.