माझा आवडता संत कवयित्री जनाबाई – मराठी माहिती, निबंध...
Answers
Answer:
माझ्या आवडत्या संत आहेत संत जनाबाई.संत जनाबाई या महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध संत कवियत्री होत्या.त्यांचा जन्म १२५८ मध्ये परभणी जिल्ह्यातील,गंगाखेड गावात झाला.त्यांचे वडील दमा हे वारकरी होते व आई करुंड भगवद्भक्त होती.ते दोघे विठ्ठलाचे भक्त होते.आई वारल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना पंढरपुरातील संत नामदेवांचे वडील दामाशेट यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले.लहानग्या नामदेवांना त्यांनी सांभाळले आणि आयुष्यभर त्या त्यांच्या दासी म्हणून राहिल्या.त्या विठ्ठलांना आई मानायच्या.
जनाबाईंनी ३४० हून अधिक भक्तीगीते, अभंग रचली. त्यांच्या कवितांमध्ये त्याग, सहिष्णुता, आपुलकी, प्रामाणिकपणा, आत्मसमर्पण आणि स्त्री भावना दिसून येतात.त्यांचे काही गाणी त्यांच्या सहकारी वारकरी आणि विष्णूच्या वेगवेगळ्या अवतारांच्या जीवनाविषयी सांगतात,त्यांच्यातील सर्वात विशिष्ट गाणी म्हणजे विठ्ठळासोबत त्यांचे वैयक्तिक नातेसंबंध सांगणारी गाणी. १३५० मध्ये,पंढरपुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Explanation:
Answer:
संतकवींनी रचलेल्या ओव्या अभंगांनी मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांच्यापासून ते संत नरहरी सोनार, संत बंका, संत चोखा मेळा, संत सेना न्हावी अशी संतांची एक फार मोठी मालिकाच दाखवता येईल. या संतांनी मराठी साहित्य संपन्न केले आहे. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे या कवींबरोबर आपणांस संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत निर्मळा अशा कवयित्रीही भेटतात. स्वत:च्या मनातील उत्कट भक्तिभाव त्यांनी अभंगरचनेतून व्यक्त केला आहे.
आपल्या संत जनाबाई या त्यांच्यापैकीच एक. त्यांचा जन्म केव्हा झाला याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. कारण ही एक वाट चुकलेली लहान मुलगी संत नामदेवांच्या वडलांना जत्रेत सापडली. तिचे कुणीही पालक सापडले नाहीत म्हणून त्यांनी तिला आपल्या घरात सांभाळले. अशी एक आख्यायिका आहे. संत नामदेवांचे घर हे भक्तिरसात टुंबलेले असे. त्यांचे आईवटील, त्यांची पत्नी, चतः संत नामदेव विठ्ठलभक्तिपर अभंग रचत, या वातावरणात वाढणान्या जनाबाट परमेश्वरभक्त झाल्या नसत्या तरच नवल. कोठल्याही शाखेत, कधीही न गेलेल्या जनाबाई आपली भक्तिभावना काव्यात व्यक्त करू लागल्या. त्यांचे थोडेथोडके नव्हेत, तर सुमारे साडेतीनशे अभंग आज उपलब्ध आहेत.
संत जनाबाई नामदेवांना आपल्या गुरुस्थानी मानत असत, म्हणून प्रत्येक अभंगाच्या अखेरीस त्या आपला उल्लेख 'नामयाची दासी उनी' असा करतात. संत जनाबाईंनी आपल्या गुरुचे म्हणजे संत नामदेवांचे चरित्र अधांतून गायले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या अभंगांतून हरिश्चंद्राचे आयात गितले आहे. कृष्णजन्म, बालक्रीडा व काला यांचे त्यांनी रसभरित वर्णन केले आहे. संत जनाबाईची परमेश्वरावर उत्कट भक्ती होती. त्यामुळे त्यांना प्रत्येक काम करताना परमेश्वर आपल्याला मदत करत आहे, असे वाटे, 'उनी केर काढते, तर चक्रपाणी केर भरतो. जनीचे जाते ओढण्यास भगवंत मदत करतो', असे त्या म्हणतात, विठ्ठलाला भेटीसाठी त्या आर्ततेने विनवणी करतात. परमेश्वराप्रमाणे संत जनाबाईंच्या मनात संतांविषयी अतीव आदर आहे. संतांचा गौरव गाताना त्या विविध रूपके योजतात. साखर व तिची गोडी वेगळी करता येत नाही, त्याप्रमाणे संत व भगवंत यांना परस्परांपासून वेगळे करता येणार नाही, असे त्या सांगतात, परमेश्वरावरील उत्कट भक्ती, शब्दांचा साधेपणा व मनाचा भोळा भाव हे संत जनाबाईंच्या रचनेचे विशेष आहेत.