माझा आवडता संत निबंध
Answers
Answer:
जन्म : १२७५
मृत्यू :१२९६
हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्मअहमदनगर जिल्ह्यातीलपैठण जवळील आपेगांव येथे झाला. सामान्य लोकांना भगवद्गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका या नावाने भगवद्गीतेवर निरूपण/भाषांतर केले. ते ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेतील विचार-तत्त्वज्ञान सामान्य माणसांना कळावेत म्हणून ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानदेवी हा ग्रंथ मराठीत लिहिला. कृष्णाच्या अवस्थेचे ज्ञानेश्वरांनी नाट्यमय वर्णन केले आहे. तद्कालीन समाजाने त्यांचा अतिशय छळ करुनही त्या दुःखाचे दर्शन त्यांनी आपल्या लेखनात कुठेच घडविले नाही हे त्यांचे मोठेपण होय.
‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह – या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली
Hope this answer will help you please mark me as brainliest.................
Answer:
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली ही परंपरा आजही अखंडित आहे. संत गाडगेबाबा हे या मालिकेतील एक महत्त्वाचे मौक्तिक. अगदी मागासलेल्या घरात जन्मलेल्या, शिक्षणाचे विशेष संस्कार नसलेल्या या महात्म्याने एवढे अमूल्य विचार लोकांपुढे मांडले की आपला विश्वासच बसत नाही.
२३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्हयातील शेणगाव या गावी एका परिटाच्या घरी गाडगेबाबांचा जन्म झाला होता. त्यांचे मूळ नाव होते डेबूजी. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी आणि आईचे नाव सखूबाई. वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांच्या घरात कायमचे दारिद्र्य होते. त्यात वडिलांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे हे मायलेकरू अनाथ झाले व छोटा डेबूजी आपल्या आईसह मामाकडे राहायला गेला. डेबू मामाकडे शेतात खूप कष्ट करत असे; पण या मामाच्या शेतावर सावकाराने जप्ती आणली. निरक्षरतेमुळे सावकाराने मामाला फसवले होते. हे डेबूने जाणले. त्यामुळे स्वतः शिकलेला नसतानाही त्याला शिक्षणाचे महत्त्व उमगले. आपले उर्वरित आयुष्य हे त्यांनी सामाजिक प्रबोधनासाठी वेचले. या प्रबोधनासाठी ते भजन, कीर्तन, प्रवचन हा मार्ग वापरत.
१९१२ रोजी त्यांचा विवाह झाला होता; परंतु ते संसारात कधी रमलेच नाही. ते नेहमी अंगावर फाटकी गोधडी घेत. त्यांच्या हातात गाडगे असे; म्हणून लोक त्यांना 'गाडगे महाराज' किंवा 'गोधडे महाराज' म्हणत. ते कधीही एका जागी जास्त काळ राहत नसत. कष्ट केल्याशिवाय कोणाकडून भिक्षाही स्वीकारत नसत. त्यांच्याजवळ नेहमी झाडू असे आणि स्वतः झाडण्याचे काम करताना ते सर्वांना स्वच्छता राखण्याचा उपदेश करत. अगदी सामान्य लोकांच्या जीवनातील उदाहरणे घेऊन ते उपदेश करत. 'चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशुंचा बळी देऊ नये' अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून करीत असत. स्वच्छता, प्रामाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते गरिबांना वाटून टाकत. त्यांना मिळालेल्या धनातून त्यांनी यात्रेकरूंसाठी धर्मशाळा बांधल्या, लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधले, नदीवर घाट देखील बांधले. अनेक ठिकाणी त्यांनी गोसंरक्षण संस्था उभारल्या. स्वत:साठी त्यांनी कोणाकडून कधीही काहीही घेतले नाही वा कधी कोणालाही शिष्य केले नाही. लोकजागृतीचे व लोकसेवेचे काम करत असताना प्रवासातच अमरावतीजवळ १९५६ मध्ये त्यांचे देहावसान झाले. असा हा महान निरिच्छ सेवाभावी संत होता.